अमरावती विभागातील शेतमजूर ‘अन्न सुरक्षा’ बाहेरच!

By Admin | Updated: July 12, 2016 00:54 IST2016-07-12T00:54:20+5:302016-07-12T00:54:20+5:30

शेतमजूरांच्या याद्या तयार आहे; शासन निर्णयाची प्रतीक्षा.

Food security in the Amravati division is out! | अमरावती विभागातील शेतमजूर ‘अन्न सुरक्षा’ बाहेरच!

अमरावती विभागातील शेतमजूर ‘अन्न सुरक्षा’ बाहेरच!

अकोला : दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सवलतीच्या दरात धान्याचा लाभ देण्यात येत आहे. शेतकर्‍यांसोबतच शेतमजुरांनाही अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात पुरवठा विभागामार्फत शेतमजुरांच्या याद्या तयार करण्यात आल्या; परंतु, सवलतीच्या दरात धान्य वाटपाबाबत शासनाचा निर्णय अद्याप प्राप्त झाला नसल्याने, विभागातील शेतमजूर ह्यअन्न सुरक्षाह्ण योजनेच्या लाभापासून अद्याप बाहेरच आहेत.
गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, राज्यातील विविध भागात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होऊ नये, यासाठी राज्यातील औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली. अमरावती विभागातील अमरावती, वाशिम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व नागपूर विभागातील वर्धा या १४ जिल्ह्यांत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दरात ३ रुपये किलो दराने तांदूळ व २ रुपये किलो दराने गहू वाटप करण्याचा निर्णय शासनामार्फत गत २४ जुलै २0१५ रोजी घेण्यात आला. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांप्रमाणेच शेतमजुरांनाही राष्ट्रीय अन्न सुरक्षेच्या धर्तीवर सवलतीच्या दरात धान्याचा लाभ देण्याची मागणी विचारात घेता, शेतकर्‍यांप्रमाणेच शेतमजुरांनाही सवलतीच्या दरात धान्याचा लाभ देण्याचे शासनामार्फत प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार अमरावती विभागातील शेतमजुरांना अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर शेतमजुरांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतमजूर लाभार्थींची निवड करून याद्या तयार करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी गत १२ फेब्रुवारी रोजी विभागातील पाचही जिल्ह्यांच्या पुरवठा विभागाला दिले होते. त्यानुसार अमरावती विभागात शेतमजुरांच्या याद्या तयार करण्याचे काम पुरवठा विभागामार्फत करण्यात आले असले तरी, शेतमजुरांना सवलतीच्या दरात धान्य वाटप करण्याचा निर्णय अद्याप शासनामार्फत घेण्यात आला नाही. तसेच यासंबंधीचा शासन आदेश पुरवठा विभागाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे शेतमजूर अद्यापही राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सवलतीच्या दरातील धान्याच्या लाभापासून वंचित असल्याची स्थिती आहे. या पृष्ठभूमीवर शेतमजुरांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय केव्हा प्राप्त होणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.

Web Title: Food security in the Amravati division is out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.