राज्यातील फळबागांचे क्षेत्र वाढविण्यावर भर!
By Admin | Updated: May 11, 2015 02:26 IST2015-05-11T02:26:17+5:302015-05-11T02:26:17+5:30
यंदा ५0 हजार हेक्टरचे उद्दिष्ट, मनरेगांतर्गत होणार लागवड.
_ns.jpg)
राज्यातील फळबागांचे क्षेत्र वाढविण्यावर भर!
अकोला : राज्यातील फलोत्पादनाचे क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात येत असूून, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) यंदा राज्यात ५0 हजार हेक्टर क्षेत्रावर फळबागा लावण्यात येणार आहेत. याकरिता फलोत्पादन संचालनालयाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. शासनाकडूून मान्यता प्राप्त होताच फळबागा लागवडीचे जिल्हानिहाय नियोजन केले जाणार आहे. विदर्भातही मागणीनुसार फळबागा लागवड केली जाणार आहे. यापूर्वी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यात फळ पिकांचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात वाढण्यास मदत झाली असून, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळ लागवडीचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करण्यात आला. या अभियानाला राज्यातील शेतकर्यांनी भरभरू न प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच देशातील फळ पीक क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. आजमितीस या राज्यात १८ लाख हेक्टरवर फळबागांचे क्षेत्र विस्तारले आहे. फलोत्पादन संचालनालयाने यंदा पुन्हा फळबागा विस्तारीकरणावर लक्ष केंद्रित केले असून, रोजगार हमी व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील जिल्हय़ांना फळ लागवडीचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे. यासाठीचे नियोजन राज्याच्या फलोत्पादन संचालनालयाने केले आहे. आजमितीस राज्यात सर्वाधिक डाळिंब आणि आंबा फळ पिकाचे क्षेत्र आहे. अलीकडे उच्चघनता तंत्रज्ञान वापरू न पेरू लागवड करण्यात येत असून, पपई व इतर फळपिकांचे क्षेत्र वाढत आहे.