भरधाव जीप पुलावरुन कोसळली

By Admin | Updated: April 25, 2015 02:17 IST2015-04-25T02:17:18+5:302015-04-25T02:17:18+5:30

शेगाव येथील घटना ; चालक जखमी.

The flying jeep collapsed from the bridge | भरधाव जीप पुलावरुन कोसळली

भरधाव जीप पुलावरुन कोसळली

शेगाव (जि. बुलडाणा) : भरधाव जीप पुलावरुन कोसळल्याची घटना शहरातील माळीपुरा परिसरात २४ एप्रिल रोजी रात्री ८.२0 वाजताचे सुमारास घडली. या घटनेत जीपचालक जखमी झाला तर सुदैवाने जीपमधील चार जण बचावले. देऊळगाव कोळ येथील जीप क्रमांक एम.एच.२८- ८३३२ ही शहरात एका लग्नसमारंभासाठी आली होती. रात्री परत जात असताना जीपचालकाचे आपल्या ताब्यातील वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर जीप माळीपुरा भागातील पुलावरुन खाली कोसळली. यामध्ये जीपचालक सुरेश काळुसे रा. देऊळगाव कोळ हा जखमी झाला. तर सुदैवाने जीपमधील चार जण बचावले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेगाव शहर पोलिस स्टेशनचे एएसआय अंभोरे, पोहेकाँ नरोटे, जनार्दन इंगळे, लक्ष्मण कटक, खुटाफळे आदींनी घटनास्थळ गाठून जखमी जीपचालकास पुलाखालून वर काढले व उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: The flying jeep collapsed from the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.