फुलांच्या बाजारात मंदी कायम
By Admin | Updated: May 11, 2014 22:52 IST2014-05-11T19:02:46+5:302014-05-11T22:52:02+5:30
विवाह समारंभांचा परिणाम नाही;हारांची किंमतही कमी

फुलांच्या बाजारात मंदी कायम
अकोला : दरवर्षी उन्हाळ्यात फुलांचे भाव गगनाला भिडतात. मात्र यावर्षी फुलांच्या बाजारात मंदी कायम असल्यामुळे शेतकरी व फूल विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. ग्राहकांना मात्र याचा फायदा होत आहे.
उन्हाळ्यामध्ये लग्नांची धूम असल्यामुळे फुलांना चांगलीच मागणी असते. या सिझनमध्ये शेतकरी व फूल विक्रेते लाखो रुपयांचे उत्पन्न घेतात. मात्र यावर्षी उन्हाळ्यातही फूल बाजारात मंदी आहे. लग्नाच्या कमी तिथी, यासोबतच फुलांचे उत्पादन घेणार्या शेतकर्यांची संख्याही वाढली आहे. तसेच अन्य राज्यातून फुलांची आयातही मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे फुलांचा तुटवडा भासत नाही. परिणामी मागणी एवढे फूल सहज उपलब्ध होतात. ज्या दिवशी लग्नाची तिथ असते, त्यादिवशी फुलांना चांगला भाव असतो. इतर दिवस मात्र फुलांचे भाव नेहमीप्रमाणेच असतात. ग्लायडर फूल व गुलाबाच्या फुलांना अन्य फुलांच्या तुलनेत जास्त मागणी असल्यामुळे या फुलांचे भाव वाढले आहेत. लग्नाचे हार, पाणेरीच्या हारांना बरीच मागणी असते. मात्र, दरवर्षी फुलांची आवक कमी असल्यामुळे फूलविक्रेते अव्वाच्या सव्वा भावात विकतात. यावर्षी मात्र या हारांची किंमतही कमी आहे.