शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीसमोर आव्हानांची मालिका; विस्तारापासून अनेक निर्णय होणार
2
Ramoji Rao : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन, ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
AFG vs NZ Live : 75 ALL OUT! अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी न्यूझीलंडला लोळवलं; राशिद-नबीने सामना गाजवला
4
आजचे राशीभविष्य : 08 जून 2024; धन व कीर्ती ह्यांची हानी होईल, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
5
...म्हणून भारताला पाकिस्तानविरूद्ध नक्कीच फायदा होईल; सिद्धूंनी सांगितला खेळ भावनांचा
6
‘नीट’ निकालाची सीबीआय चौकशी करा, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह ‘आयएमए’ची देखील मागणी
7
तूर्तास राजीनामा नको; शपथविधीनंतर चर्चा करू, गृहमंत्री अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला
8
T20 World Cup 2024 : आयर्लंडला हरवून कॅनडानं रचला इतिहास; आता 'लक्ष्य' पाकिस्तान, दिला इशारा
9
विधानसभेला कोकणात सर्व जागा जिंकणार, खासदार सुनील तटकरे यांना विश्वास 
10
केजरीवालांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध, सबळ पुरावे हाती असल्याचा तपास यंत्रणेचा कोर्टात दावा
11
गो-फर्स्टची तारण जमीन विकून होणार, केवळ ५० टक्क्यांचीच वसुली
12
अस्खलित मराठी बोलणारा नेता झाला बिहारमधून खासदार!
13
‘मोठा भाऊ’वरून पटोलेंना पक्षश्रेष्ठींच्या कानपिचक्या; महाविकास आघाडीत संघर्ष वाढण्याआधीच काँग्रेस सावध
14
राज्यातील ११ खासदारांची हॅट्ट्रिक रोखली; १० जणांना दुसऱ्यांदा संधी नाकारली  
15
शिंदे, फडणवीस, पवार यांची नवी दिल्लीत पटेल यांच्या निवासस्थानी बैठक
16
एअर इंडिया - विस्ताराचे विलीनीकरण अखेर मार्गस्थ
17
राणे बंधूंचा गैरसमज दूर करणार : उदय सामंत
18
आघाडी सरकारमुळे संघाच्या अजेंड्याचे काय होणार? मित्रपक्षांतील ‘बाबू फॅक्टर’मुळे अडथळे येण्याची शक्यता
19
शेअर बाजार घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी 'त्या' दिवशी बक्कळ कमाई केली; पाहा...
20
ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..."

पातूर, बार्शीटाकळी तालुक्यात मजुरांचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 6:12 PM

गत काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने मजूर जिल्ह्यात दाखल होत आहेत.

अकोला : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना देशभरातील इतर शहरांमध्ये अडकून पडावे लागले. त्यामध्ये शिथिलता आल्याने गत काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने मजूर जिल्ह्यात दाखल होत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून त्या प्रवाशांची तपासणी केली जात असून, त्यांना गावातच अलगीकरणात ठेवले जात आहे. १६ मे रोजी जिल्ह्यात १,३९४ प्रवासी दाखल झाले आहेत. त्यापैकी तीन प्रवाशांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या २९,०४२ झाली असून, २६१जणांवर पुढील उपचार करण्यात आले. २४,४९६ जणांचा अलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाउनच्या काळातही जिल्ह्यात प्रवाशांचा ओघ सुरूच होता. आता इतरत्र अडकलेल्या सर्वांनाच आपल्या मूळ जिल्ह्यात जाण्यासाठी वाहनांची सोय तसेच परवानगी मिळाली. त्यामुळे देशभरातून प्रवाशांचा ओघ वाढला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे.ऐन प्रसाराचा वेग वाढण्याच्या काळात प्रवासी येत असल्याने कोरोना प्रसाराचा धोका दैनंदिन वाढतच आहे. आतापर्यंत आलेल्या प्रवाशांपैकी पुढील उपचाराची गरज असलेल्या तसेच संदिग्ध म्हणून २६१ व्यक्तींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. बाहेर जिल्ह्यातून दाखल झाल्याने घरातच ‘क्वारंटीन’ केलेल्या सर्व प्रवाशांची संख्या १६ मेपर्यंत २९,०४२ आहे. त्यापैकी २४,४९६ प्रवाशांचा ‘क्वारंटीन’ कालावधी समाप्त झाला आहे. आता ४,२६० प्रवाशी ‘क्वारंटीन’ आहेत. ‘क्वारंटीन’ केलेल्या प्रवाशांची संख्याही दैनंदिन वाढतीच आहे. त्यामुळे त्यांचा कालावधी संपुष्टात येईपर्यंत कोरोना प्रसाराच्या धोका कायम आहे.

 १६ मे रोजी दाखल झालेले प्रवासीप्राथमिक आरोग्य केंद्र आपातापा-२९, पळसो-२१, कुरणखेड-२१, कापशी-२९,आगर-२९, दहीहांडा-१४, कावसा-३६, मुंडगाव-२५, सावरा-२६, पारस-३०,उरळ-९०, हातरूण-२९, वाडेगाव-२५, धाबा-१३०, कान्हेरी सरप-६९, महान-७७,पिंजर-१४६, पातूर-१११, बाभूळगाव-४६, आलेगाव-४०, मळसूर-१३, सस्ती-२४,अडगाव-३३, पंचगव्हाण-३२, हिवरखेड-२, दानापूर-११, कुरूम-३७, धोत्रा-६७, पारद-६७, जामठी-८५ प्रवासी दाखल झाले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरBarshitakliबार्शिटाकळीLabourकामगार