मशाल रॅलीने झुलेलाल महोत्सवास प्रारंभ
By Admin | Updated: March 28, 2016 01:28 IST2016-03-28T01:28:51+5:302016-03-28T01:28:51+5:30
यंदाचे आकर्षण ठरणार झुलेलाल महाराजांची ३0 फूट उंच मूर्ती.

मशाल रॅलीने झुलेलाल महोत्सवास प्रारंभ
अकोला: श्री झुलेलाल समितीच्या वतीने रविवारी काढण्यात आलेल्या मशाल रॅलीने झुलेलाल महोत्सवाला प्रारंभ झाला.
सायंकाळी ५ वाजता नानक नगर, निमवाडीतील शिवमंदिरापासून निघालेली भव्य मशाल रॅली सिंधी कॅम्पमधील संत कंवरराम प्रतिमेजवळ समाप्त झाली. यंदाचे मुख्य आकर्षण असलेली श्री झुलेलाल महाराजांची ३0 फूट उंच आणि ६0 फूट रुंद आकाराची भव्य मूर्ती या ठिकाणी उभारण्यात आली आहे. मशाल रॅलीच्या समाप्तीनंतर आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते श्री झुलेलाल महाराजांच्या भव्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कन्हैयालाल रंगवानी, तर प्रमुख अतिथी म्हणून किशोर मांगटे पाटील, विजय अग्रवाल, मुरलीधर जेठवानी, ईश्वरलाल शर्मा, प्रकाश आनंदानी उपस्थित होते.
यावेळी नंदलाल ठकरानी, हरिष कटारिया, रमेश जग्यासी, लक्ष्मण पंजाबी, कमलेश कृपलानी, नितीन वाधवानी, अजय माखीजा, कमल सचदेव, अभय आनंदानी, गोलू कटारिया, रोहिम मुलचंदानी, अक्षय दुलानी, मनीष दुलानी, रंजना पंजवानी, किरण थावरानी, ज्योती छत्तानी, दिव्या भाटिया, रेखा सैनानी, कशिश भाटिया, शोभा बालानी, रेखा बालानी आदींचीदेखील प्रमुख उपस्थिती होती.
या महोत्सवादरम्यान ३१ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी समिती अध्यक्ष गोपीचंद धनवानी, प्रकाश आलिमचंदानी, संतोष वाधवानी, अनिल बख्तार, सुनील जेसवानी, प्रताप आहुजा, महेश मनवानी, वासुदेव आनंदानी, ब्रह्मनंद वलेछा, अनिल परियानी, नरेंद्र भाटिया, विजय छत्तानी, मनीष बजाज, जय लोकवानी, सुधीर बेलानी, पुरुषोत्तम बालानी, जल बुलानी, किशोर आलिमचंदानी, अमर कुकरेजा, दिनेश बजाज, सुरेश चंदनानी आदी परिश्रम घेत आहेत.