महाराष्ट्र दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातच ध्वजारोहण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:17 IST2021-05-01T04:17:37+5:302021-05-01T04:17:37+5:30

अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले ...

Flag hoisting at the Collectorate today on the occasion of Maharashtra Day! | महाराष्ट्र दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातच ध्वजारोहण!

महाराष्ट्र दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातच ध्वजारोहण!

अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथेच शनिवार, १ मे रोजी सकाळी ८ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. साधेपणाने आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

ध्वजारोहण कार्यक्रमास केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार असून, जिल्ह्यातील सर्व विभागांचे मुख्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय येथे कोठेही कार्यक्रम आयोजित करू नये, मुख्यालयात आयोजित कार्यक्रमासही अन्य अधिकारी- कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहू नये. जिल्हाधिकारी कार्यालय वगळता जिल्ह्यात कोठेही ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या आहेत.

Web Title: Flag hoisting at the Collectorate today on the occasion of Maharashtra Day!