शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
2
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
3
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
4
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
5
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
6
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
7
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
8
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
9
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
10
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
11
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
12
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
13
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
14
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
15
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
16
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
17
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
18
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
19
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
20
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू

अपघातास कारणीभूत टँकर चालकाला पाच वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 11:15 IST

न्यायाधीश एन.जी. शुक्ला यांच्या न्यायालयाने ट्रकचालकास गुरुवारी पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

अकोला : शेगाव टी पॉइंटकडून गायगावकडे जात असलेल्या एका दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्यानंतर या अपघातात दाम्पत्य ठार झाले होते. जुने शहर पोलिसांनी ट्रकचालकाची वैद्यकीय तपासणी केली असता मद्यधुंद अवस्थेत त्याने अपघात केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.जी. शुक्ला यांच्या न्यायालयाने ट्रकचालकास गुरुवारी पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. यासोबतच दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे.प्रकाश महादेव बेलोकार व त्यांची पत्नी रेखा प्रकाश बेलोकार हे १५ आॅगस्ट २००८ रोजी संध्याकाळी अंदाजे साडेसहा वाजताच्या सुमारास एम.एच.३० यु ६२७७ क्रमांकाच्या दुचाकीने अकोल्यावरून गायगावकडे जात होते. रेल्वे गेटसमोरील संगम ढाब्याच्या समोर एका भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या भीषण अपघातात पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाला होता. याप्रकरणी टँकरचालक अब्दुल शारीक अब्दुल रशीद याला ताब्यात घेतल्यानंतर तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले होते. यावेळी त्याच्यासोबत उमेश बाबूराव मिसाळ हासुद्धा होता. जुने शहर पोलिसांनी टँकरचालक अब्दुल शारीक अब्दुल रशीद याच्यासह उमेश मिसाळ या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४(भाग २) व मोटार वाहन कायदा कलम १८५ नुसार गुन्हा दाखल करून न्यायालयात खटला दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश एन.जी. शुक्ला यांच्या न्यायालयात झाली. याप्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने सात साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आरोपी अब्दुल शारिक अब्दुल रशीद याला दोषी ठरवले तर त्याचा सोबती उमेश मिसाळ याला दोषमुक्त केले.न्यायालयाने टँकरचालक शारिक रशिद याला भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४ अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास तसेच दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तर मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये सहा महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या दोन्ही शिक्षा आरोपीला सोबत भोगावयाच्या आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघातCourtन्यायालयjailतुरुंग