पाच वर्षांपासून अविरत सुरू आहे किशोरदांचा ‘कारवॉ’
By Admin | Updated: August 4, 2014 00:19 IST2014-08-04T00:19:49+5:302014-08-04T00:19:49+5:30
दिनविशेष : गायक किशोरकुमार यांची आज जयंती

पाच वर्षांपासून अविरत सुरू आहे किशोरदांचा ‘कारवॉ’
वाशिम : आपल्या आवाजाच्या जादूने सर्वांना भूरळ घालत अजरामर झालेल्या किशोरदांचा कारवाँ आजही सुरुच आहे. त्यांच्या कारव्याचे घटक बनून त्यांच्या गितातून प्रेरणा घेणार्या स्वरांजली कला मंचच्या हरहून्नरांनी त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून गेल्या ५ वर्षापासून वाशिममध्येही 'कारवाँ किशोर का'च्या नावाने किशोरदांच्या आठवणींना उजाळा देण्यासह नवोदीत गायकांना मंच उपलब्ध करुन देण्याचा वसा घेतला आहे. ज्यांच्या गितांना गायनाला नवं रुप दिलं अशा किशोरदांचा गाणं न गुणगुणनारा व्यक्ती सापडणं मुश्कील. ज्याला गायनाचा छंद आहे तो आपल्या गायनाची सुरुवातच किशोरदांच गाण्यान करतो अन् ज्याचा सुर तालाशी काही संबंध नाही असाही किशोरदांच गाण गुणगुणन्याचा प्रयत्न करतो यातच किशोरदांच्या गाण्याच महत्व दडलेलं आहे. अशा अजरामर गायकाच्या जयंतीचे औचित्य साधून गेल्या पाच वर्षापासून वाशिम येथील स्वरांजली कला मंच व आर. के. गृपच्या समन्वयातून 'कारवाँ किशोर का', या गीतस्पर्धेचे आयोजन केले जाते. यातील अनियमीतता दूर करुन नव्या जोमाने स्वरांजली कला मंच गत पाच वर्षापासून किशोरदांच्या जयंतीच्या औचित्याने त्यांना समर्पीत कार्यक्रचे आयोजन करतो आहे. यासाठी स्वरांजली कला मंचचे डॉ. संदेश राठोड, डॉ. विलास इंगळे, बाळू मुठाळ, कुणाल तायडे, रविंद्र डोंगरदिवे, जनता बँकेचे राजेश अग्रवाल आदी कसोशिने प्रयत्न करतात. दरवेळी किशोरदांच्या जयंतीदिनी नवोदितांची ऑडीशन घेवून त्यानंतर ..कारवाँ किशोर का च्या माध्यमातून नवोदीतांना आपल्या कलागुणांना प्रस्तूत करण्याची संधी दिली जाते. यावेळी ४ ऑगस्ट या किशोरदांच्या जयंतीदिनी नवोदीतांची ऑडिशन होणार असून त्यांनंतर १६ ऑगस्टला नवोदीत आपल्या कलेचे सादरिकरण करणार आहेत. दरवर्षी किमान ४0 ते ५0 नवोदीत गायक कारवाँ किशोर कां साठी ऑडीशन देतात. त्यापैकी किमान २५ ते ३0 जणं दरवर्षी मुख्य स्पर्धेत सहभागी होतात. त्यामधून दरवर्षी तीन मुख्य विजेते व दोन जणांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाते. स्वरांजली कला मंच गायनाला आयाम देणार्या सर्वच गायकांच्या आठवणींना उजाळा देण्याचे काम करत आहे. गतवर्षी मन्ना डेंच्या आठवणीना गायनाच्या माध्यमातून उजाळा देत श्रोत्यांना आवाजाने अजरामर झालेल्या आणखी एका गायकाच्या आठणीत रमण्याची संधी स्वरांजलीच्या शिलेदारांनी उपलब्ध करुन दिली होती.