कंत्राटी पाच मजूर केवळ कागदावर!
By Admin | Updated: September 1, 2014 01:38 IST2014-09-01T01:38:16+5:302014-09-01T01:38:43+5:30
अकोला महानगर पालिकेतील प्रकार; कंत्राटी पाच मजूर केवळ कागदावर.

कंत्राटी पाच मजूर केवळ कागदावर!
आशिष गावंडे / अकोला
प्रभागातील दैनंदिन साफसफाईसाठी १५ ते २0 सफाई कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी २८ स्वच्छता निरीक्षक व सहाय्यक आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. नगरसेवकांच्या आग्रहाखातर पुन्हा कंत्राट तत्त्वावरील पाच मजूर सेवेसाठी नियुक्त करण्यात आले आहे. केवळ साफसफाईच्या कामासाठी एवढा मोठा लवाजमा असताना पडीत असो वा प्रशासकीय, या दोन्ही प्रभागांमध्ये प्रचंड घाण व कचरा साचल्याची स्थिती आहे. वर्षाकाठी ७0 ते ९0 लाख रुपयांचे देयक प्राप्त करणारे कंत्राटी पाच मजूर केवळ कागदोपत्री काम करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शहरातील सर्व्हिस लाईन घाण व कचर्याने बाराही महिने तुडुंब भरलेल्या असतात. पावसाळय़ात नाले-गटारांचे घाण पाणी अक्षरश: नागरिकांच्या घरात शिरते; परंतु सर्वसामान्यांच्या समस्येशी सर्वपक्षीय नगरसेवकांना काहीही घेणे-देण नाही. केवळ आर्थिक हित साधल्या जात असल्याचे चित्र आहे. दैनंदिन साफसफाईसाठी १६ प्रशासकीय प्रभागात आस्थापनेवरील सफाई कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असून, २0 पडीत प्रभागांसाठी खासगी सफाई कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली. हा प्रकार कमी म्हणून की काय, या सफाई कर्मचार्यांच्या दिमतीला पुन्हा कंत्राटी पद्धतीनुसार पाच मजुरांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाल्या-गटारांची साफसफाई नियमित नव्हे, ती दररोज करणे मनपाला भाग असताना तसे होत नसल्याचे वास्तव आहे. अर्थातच, एका प्रभागात दररोज साफसफाई करणार्या कर्मचार्यांची संख्या २0 पेक्षा जास्त असूनसुद्धा सर्व्हिस लाईनमध्ये कचर्याचे ढीग साचले आहेत. अशा स्थितीत कंत्राटी पाच मजुरांचा ह्यफंडाह्ण वापरून प्रशासन व नगरसेवक मनपाच्या तिजोरीतून अक्षरश: लूट करीत असल्याचे लक्षात येते. १६ प्रशासकीय प्रभागांमध्ये १६0 कंत्राटी पाच मजूर कार्यरत आहेत. या मजुरांना दररोज साफसफाई करण्यासाठी प्रती दिवस १२३ रुपये मानधन दिले जाते. वर्षाकाठी ७0 ते ९0 लाखाची रक्कम पाच मजुरांच्या नावाने अदा केली जात असताना, प्रत्यक्षात सर्व मजूर कागदोपत्री कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली
*१२३ रुपयांतही घोळ
कंत्राटी पाच मजुरांना प्रती दिवस १२३ रुपये प्रमाणे मजुरी देणे आवश्यक आहे. संबंधित कंत्राटदार मात्र मजुरांना दिवसाकाठी फक्त १00 रुपये मजुरी देत असल्याची माहिती आहे. एकीकडे प्रशासनाकडून १२३ रुपये प्रमाणे देयक वसूल केले जात असताना, त्यातही घोळ होत आहे.
*प्रशासकीय प्रभागावर मेहरबानी
आस्थापनेवरील ७४८ सफाई कर्मचार्यांच्या वेतनापोटी मनपाला महिन्याकाठी २ कोटी अदा करावे लागतात. प्रशासकीय १६ प्रभागात आस्थापनेवरील सफाई कर्मचारी कार्यरत असताना त्यांच्या दिमतीला ५ मजूर देण्यात आले. या तुलनेत पडीतच्या २0 प्रभागातील साफसफाईवर महिन्याकाठी फक्त २0 लाख रुपये खर्ची होतात. प्रशासकीय प्रभागावर नगरसेवक व प्रशासनाची एवढी मेहरबानी का, असा सवाल उपस्थित होत आहे.
*कंत्राट रद्द करण्यासाठी ठोस निर्णय अपेक्षित!
कंत्राटी पाच मजुरांच्या नावाखाली संबंधित अधिकारी व नगरसेवकांनी आर्थिक मलिदा लाटण्याचा उद्योग सुरू केला. परिणामी मनपावर वर्षाकाठी ७0 ते ९0 लाखांचा बोजा पडत असताना, हा कंत्राट रद्द करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. प्रशासनाने या विषयावर ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे.