डीझलसह पाच टायर लंपास
By Admin | Updated: June 25, 2017 08:12 IST2017-06-25T08:12:28+5:302017-06-25T08:12:28+5:30
टँकरच्या पाच टायरसह १५0 लीटर डीझल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली.

डीझलसह पाच टायर लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : घरासमोर उभ्या असलेल्या टँकरच्या पाच टायरसह १५0 लीटर डीझल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास रियाज कॉलनी, गंगा नगरात घडली. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गंगा नगरात राहणारे शेख जमील शेख जलील (६0) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा टँकर घरासमोर उभा असताना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी टँकरचे पाच टायर, पाच डिक्स, दोन बॅटरी, साऊंड सीस्टिम आणि टँकरमधील १५0 लीटर डीझल लंपास केले. एकूण १ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. शेख जमील यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.