शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कार अपघातात अकोल्यातील दुबे परिवारातील पाच गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:57 IST

अकोला : अंत्यविधी उरकून परतणार्‍या अकोला येथील दुबे कुटूंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने धडक देवून झालेल्या अपघातात पाच व्यक्ती गंभिर जखमी झाले. ही घटना अमरावती-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाघूड फाट्यानजिक (मलकापूर जि.बुलडाणा) दुपारी १.३0 वाजता घडली. यात एक महिला अत्यवस्थ झाल्याने तिला अकोला येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. 

ठळक मुद्देअंत्यविधी उरकून परतणार्‍या अकोला येथील दुबे कुटूंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने दिली धडक अपघातात पाच व्यक्ती गंभिर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अंत्यविधी उरकून परतणार्‍या अकोला येथील दुबे कुटूंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने धडक देवून झालेल्या अपघातात पाच व्यक्ती गंभिर जखमी झाले. ही घटना अमरावती-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाघूड फाट्यानजिक (मलकापूर जि.बुलडाणा) दुपारी १.३0 वाजता घडली. यात एक महिला अत्यवस्थ झाल्याने तिला अकोला येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले.   अकोला येथील राधाकृष्ण प्लॉटमधील रहिवाशी दुबे कुटूंबीय बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील टेंभी माकोडी येथे अंत्यविधीसाठी टाटा नॅनो कार क्र.एमएच-पी-४0६१ ने आले होते. अकोला येथे परत जात असतांना दुपारी १.३0 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरून नागपूरकडून मुंबईकडे भरधाव जाणारा ट्रक क्र.एमएच३४-ए-५३३६ कारवर आदळला. त्यात नॅनो चालक रमेश बिहारीलाल दुबे (वय ५८), मोहनप्रसाद बिहारीलाल दुबे (वय ५४), सौ.संगीता मोहनप्रसाद दुबे (वय ४५), अनिता रमेश दुबे (वय ५१), सौ.गिता अनिल दुबे असे पाच जण गंभीररित्या जखमी झाले. त्यापैकी अनिता दुबे यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. इतरांवर डॉ.कोलते हॉस्पीटलात उपचार करण्यात आले. अपघातातील रमेश दुबे हे अकोला वनविभागाचे रेंजर ऑफिसर असून मोहनप्रसाद दुबे हे अकोला पोलिस अधिक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत आहेत. या घटनेत पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.  

टॅग्स :Akola cityअकोला शहरAccidentअपघात