बोगस सिमकार्डप्रकरणी पाच व्यावसायिकांवर गुन्हा
By Admin | Updated: December 24, 2015 03:05 IST2015-12-24T03:05:20+5:302015-12-24T03:05:20+5:30
पाच व्यावसायिकांवर बुधवारी सिव्हिल लाइन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

बोगस सिमकार्डप्रकरणी पाच व्यावसायिकांवर गुन्हा
अकोला: तक्रारकर्त्याच्या नावाचा व आधारकार्डचा वापर करून बोगस सिमकार्ड दुसर्या व्यक्तीस देऊन फसवणूक करणार्या पाच व्यावसायिकांवर बुधवारी सिव्हिल लाइन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सिंधी कॅम्प परिसरात राहणारे रोशन मनोज राजपाल आणि नीलेश राजकुमार जोतवानी यांच्या तक्रारीनुसार, अथर्व मोबाइल म्युझिक गॅलरी, अक्षत स्टेशनरी, झेट्रॉनिक्स सेल्स या तीन प्रतिष्ठानांचे संचालक आणि अँक्टीव्हेशन अधिकारी विठ्ठल गणेश दुदाने आणि अज्ञात सिमकार्डधारक यांनी संगनमत करून दोघाही युवकांच्या आधारकार्डचा दुरुपयोग करून, त्यांच्या नावावर बोगस सिमकार्ड उपलब्ध करून दिले. त्यांच्या तक्रारीनुसार, सिव्हिल लाइन पोलिसांनी भादंवि कलम ४२0, ४६८ नुसार गुन्हा दाखल केला.