एकाच कुटुंबातील पाच जणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: January 2, 2015 00:25 IST2015-01-02T00:25:07+5:302015-01-02T00:25:07+5:30
अकोला जिल्हय़ातील घटना, तीन जण गंभीर.

एकाच कुटुंबातील पाच जणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न
उरळ (जि. अकोला): एकाच कुटुंबातील पाच जणांनी विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवार, १ जानेवारी रोजी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात मोरझाडी या गावात घडली. विष प्राशन केलेल्या पाचही जणांवर अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. प्राप्त माहितीनुसार, बाळापूर तालुक्यातील उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मोरझाडी येथील अनिल बाबाराव मोरखडे (५0), रेखा अनिल मोरखडे (४५) धीरज अनिल मोरखडे (२0), प्रीती अनिल मोरखडे (१५) व सुरज अनिल मोरखडे या एकाच कुटुंबातील पाच जणांनी सोमवारी सकाळी शेतात जाऊन विषारी द्रव्य प्राशन केले. विष प्राशन केल्यानंतर चार जण अत्यवस्थ होऊन तेथेच कोसळले. विष प्राशन केलेला धीरज शुद्धीवर असल्याने त्याने गावात या घटनेची माहिती दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मोरखडे कुटुंबातील चौघांना तातडीने अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात दाखल केले. या कुटुंबाने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले, तरी या मागे छेडखानीच्या प्रकरणाची किनार असल्याचे बोलले जात आहे. उरळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.