शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

वाहनांवर दगडफेक करून तोडफोड करणाऱ्या पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 13:07 IST

१0 ते १२ जणांच्या टोळक्याने हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौक व निशांत टॉवरसमोर दगडफेक करीत चार वाहनांची तोडफोड केली.

अकोला: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध तहफ्फुजे कानून कमिटीच्यावतीने रविवारी दुपारी अकोला क्रिकेट क्लबवर जनसभा घेतली होती. ही सभा आटोपल्यानंतर १0 ते १२ जणांच्या टोळक्याने हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौक व निशांत टॉवरसमोर दगडफेक करीत चार वाहनांची तोडफोड केली. दगडफेकीमध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह एक वृद्ध महिला जखमी झाली होती. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी मंगळवारी पाच जणांना अटक केली.अकोला क्रिकेट क्लब मैदानावरून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध तहफ्फुजे कानून कमिटीच्यावतीने रविवारी दुपारी जनसभा घेतली. जनसभेनंतर बस स्टँडजवळील हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौकात आल्यावर मोर्चातील काही विघ्नसंतोषी १0 ते १२ जणांच्या टोळक्याने अचानक पोलीस कर्मचाºयांसोबतच आॅटोरिक्षा, चारचाकी वाहनांवर दगडफेक केली. बस स्टँड चौक, निशांत टॉवरजवळील वझे फोटो स्टुडिओ, आर्य समाज मंगल कार्यालयाजवळीलही वाहनांवर दगडफेक केली. या दगडफेकीत चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी अज्ञात १0 ते १२ व्यक्तींविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३४१, ३५३, ३३२, ३३६, ४२७, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा, कलम ७ क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट १९३२ नुसार गुन्हा दाखल केला होता. तपास सुरू केल्यावर पोलिसांनी मोहम्मद खिजर अब्दुल रहीम रा. मोरखेवाडी, सैयद शमशोद्दीन सैयद मोबीन रा. अंबिका नगर, अब्दुल कलीम अब्दुल हफिज रा. गंगानगर, शेख इलियास शेख अयाज रा. देशपांडे प्लॉट आणि शाकीर खान अहमद खान रा. हमजा प्लॉट या पाच जणांना अटक केली. आरोपींना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी