अकाेट येथून पाच लाखांचा गुटखा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:23 IST2021-09-12T04:23:36+5:302021-09-12T04:23:36+5:30

अकाेला : अकाेट शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान नगर येथे एका घरातून माेठ्या प्रमाणात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची विक्री सुरु ...

Five lakh gutka stocks seized from Akate | अकाेट येथून पाच लाखांचा गुटखा साठा जप्त

अकाेट येथून पाच लाखांचा गुटखा साठा जप्त

अकाेला : अकाेट शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान नगर येथे एका घरातून माेठ्या प्रमाणात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची विक्री सुरु असल्याच्या माहितीवरुन पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने शनिवारी छापा टाकला. येथील एका घरातून तब्बल ५ लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे. अकाेट शहरातील हनुमान नगर येथील रहिवासी रवी तुकाराम नालट हा त्याच्या राहत्या घरातून प्रतिबंधित असलेल्या विमल, वाह, काली बहार, सीतार, नजर यासह विविध प्रतिबंधित असलेल्या गुटख्यांची माेठ्या प्रमाणात विक्री करत असल्याची माहिती पाेलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरुन त्यांनी पथकासह छापा टाकून रवी नालट याच्या घरातून तब्बल पाच लाख रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा साठा जप्त केला. संबंधित आराेपीविरुध्द अकाेट शहर पाेलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख पाेलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Five lakh gutka stocks seized from Akate