शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

फिट इंडियामुळे क्रीडा शिक्षक होणार ‘अनफिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 15:11 IST

अतिरिक्त तासिका मिळणार नसल्यामुळे कामाच्या व्यापात क्रीडा शिक्षकच अनफिट होतील.

- नीलिमा शिंगणे-जगडबालेवाडी पुणे येथे फिट इंडिया अंतर्गत शारीरिक शिक्षण शिक्षकांसाठी मास्टर ट्रेनिंग शिबिर पार पडले. प्रत्येक जिल्ह्यातील पाच ट्रेनर जिल्हास्तरावर शिक्षकांना ट्रेनिंग देणार असून, फिट इंडिया हा प्रोग्राम प्रत्येक शाळेत उपलब्ध वेळातच राबवायचा आहे. यामुळे शिक्षकांचे काम वाढणार आहे; मात्र तासिका तेवढ्याच राहणार आहेत. अतिरिक्त तासिका मिळणार नसल्यामुळे कामाच्या व्यापात क्रीडा शिक्षकच अनफिट होतील. विद्यार्थी मात्र फिट होणार आहेत.क्रीडा शिक्षकांना शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची माहिती या उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या अधिकृत लिंकला भरावयाची आहे. या अंतर्गत ठरवून दिलेल्या सर्व चाचण्यांची माहिती शारीरिक शिक्षकाला वेळोवेळी अपलोड करावयाची आहे. तसेच फिटनेस चाचण्या घेणे, गुणांकन करणे, ती माहिती आॅनलाइन अपलोड करणे, प्रोग्रेस कार्ड पालकांना देणे इत्यादी कामे करावी लागणार आहेत. या चाचण्या वर्षातून दोन वेळा घ्याव्या लागणार आहेत. प्रोग्रेस कार्डद्वारे या क्षमता पालकापर्यंत पोहोचविण्याचे काम शिक्षकाला करावे लागणार आहे.फिट इंडिया मुव्हमेंट ही संकल्पना क्रीडा विभागाची आहे. शारीरिक शिक्षण शिक्षकाची आस्थापना शिक्षण विभागाशी आहे. फिट इंडिया मुव्हमेंटसाठी क्रीडा विभाग राबवतो आहे. त्यामुळे शिक्षकांनाही क्रीडा विभागाचे काम विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी करावे लागणार. शारीरिक शिक्षण शिक्षकाचा क्रीडा विभागाशी संबंध फक्त स्पर्धेपुरता येतो; मात्र या योजनेमुळे शिक्षक सतत क्रीडा विभागाशी संपर्कात राहणार आहे. फिट इंडिया चाचण्या घेऊन मूल्यांकन करावयाचे आहे. हे मूल्यांकन अभ्यासक्रमाशी वा पाठ्यक्रमाशी जोडले जाणार आहे. याकरिता वाढीव तासिका मिळणार नाही. शिक्षकांना वेळ दिल्यास फिट इंडिया मुव्हमेंट ही संधी होईल.निर्धारित अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम पूर्ण करणे व खेळ सराव घेणे यासाठीच तासिका कमी पडतात तर फिट इंडिया मुव्हमेंट राबविण्यासाठी, त्याचे मूल्यांकन करणे, वर्षातून दोन वेळा टेस्ट घेणे, गुण आॅनलाइन अपलोड करणे ही कामे शिक्षकांचीच वाढणार आहेत. तसेच शालेय स्तरावर अभ्यासक्रमाशी निगडित प्रात्यक्षिक परीक्षा व मूल्यमापन या बाबी नेहमीप्रमाणे कराव्या लागणार आहेतच. अभ्यासक्रमाशी निगडित प्रात्यक्षिक परीक्षा व मूल्यांकन या बाबी फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत चाचणी व त्याचे मूल्यांकन यांच्याशी जोडल्या गेल्या पाहिजेत. शिक्षण विभागामार्फत हे राबविले पाहिजे. अन्यथा याकडे एक प्रयोग म्हणूनच पाहिल्या जाईल.प्रात्यक्षिक परीक्षेअंतर्गत गुणांकनासाठी फिट इंडिया चाचणीचे गुणही विचारात घेतल्यास सातत्य टिकू शकेल. अन्यथा ही क्रीडा खात्याची फक्त योजना म्हणून राहील. चाचणी घेतल्याने विद्यार्थी फिट होईल असे नाही. विद्यार्थी फिट होण्यासाठी निधारित क्षमता प्राप्त होणे आवश्यक आहे. याबाबत काहीच निर्देश नाहीत. या बाबी अभ्यासक्रमाशी जोडून प्रात्यक्षिकात समावेश होणे आवश्यक आहे, असे क्रीडा तज्ज्ञांचे मत आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक