फिट इंडिया फ्रिडम रन : तंदुरुस्तीसाठी कुठेही धावा...कधीही धावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 11:20 AM2020-09-02T11:20:33+5:302020-09-02T11:20:50+5:30

‘फिट इंडिया’ अंतर्गत ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ चळवळ राष्ट्रीय क्रीडा दिनापासून २ आॅक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहे.

Fit India Freedom Run: Run anywhere for fitness ... Run anytime! | फिट इंडिया फ्रिडम रन : तंदुरुस्तीसाठी कुठेही धावा...कधीही धावा!

फिट इंडिया फ्रिडम रन : तंदुरुस्तीसाठी कुठेही धावा...कधीही धावा!

Next

अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते२९ आॅगस्ट रोजी फिट इंडिया चळवळीला सुरुवात झाली आहे. व्यायामाकरीता धावणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. नियमीत व्यायामाकरीता प्रोत्साहित करण्यासाठी आणि सवार्ना लठ्ठपणा, आळस, तणाव, चिंता, आजार इत्यादीपासून मुक्त होण्यासाठी ‘फिट इंडिया’ अंतर्गत ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ चळवळ राष्ट्रीय क्रीडा दिनापासून २ आॅक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहे. या चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. या उपक्रमाअंतर्गत ‘तुम्ही कुठेही, कधीही धावू/चालू शकता’. प्रत्येक जण धावण्यासाठी, चालण्यासाठी आपल्या आवडीचा मार्ग, व्यक्तीश: अनुकूल वेळ निवडू शकतो. आवश्यकतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेऊनही धावणे किंवा चालू शकणार आहेत. प्रत्येकास स्वत:च्या वेगाने धावणे किवा चालण्याची मुभा असणार आहे. स्वयंचलितपणे किंवा कोणत्याही ट्रेकिंग अप किंवा जीपीएस घड्याळचा वापर करुन धावलेल्या किंवा चाललेल्या अंतराचा मागोवा घेता येणार आहे. फिट इंडिया फ्रीडम रन मध्ये सहभागी होण्यासाठी पुढील आॅनलाईन कार्यवाही करावी लागणार आहे. सर्वांनी गुगल क्रोम फिट इंडियाच्या  www.fitindia.gov.in या संकेतस्थळावर  जाऊन आपल्या नावचे अकाऊंट तयार करून लॉग इन करावे. अकाऊंट तयार करतांना नाव, ई-मेल, संपर्क क्रमांक, राज्य, जिल्हा इ. बाबी आवश्यक आहे, लाँग इन केल्यानंतर दिलेली माहितीमध्ये धावलेले किवा चाललेले अंतर, मॅराथॉनची माहिती फोटोसह अपलोड करावी, ही माहिती स्वतंत्रपणे वरील संकेतस्थळावर मोबाईलव्दारे किंवा संगणकाव्दारे अपलोड करावा. सदर अपलोड केली असता यामध्ये सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र ई मेल किंवा PDF या फॉरमेटव्दारे प्राप्त होणार आहे. फिट इंडिया माहिती अपलोड ल्यानंतर https://forms.gle/zUU7pRmsq6VGeqt49 या लिंकवर माहिती अपलोड करावी. या लिंकवर माहिती अपलोड करावी. अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, एकविध क्रीडा संघटना, विविध क्लब व इतर सर्वांनी फिट इंडिया फ्रीडम रन या चळवळीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

Web Title: Fit India Freedom Run: Run anywhere for fitness ... Run anytime!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला