पहिले लग्न व मुलांची माहिती लपवून केले दुसरे लग्न!

By Admin | Updated: May 29, 2014 23:23 IST2014-05-29T22:14:49+5:302014-05-29T23:23:01+5:30

पत्नीने पहिल्या लग्नाची माहिती दडवून ठेवत दुसरे लग्न केल्याप्रकरणी पत्नीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.

First marriage and children's information hidden by another wedding! | पहिले लग्न व मुलांची माहिती लपवून केले दुसरे लग्न!

पहिले लग्न व मुलांची माहिती लपवून केले दुसरे लग्न!

अकोला: पत्नीने पहिल्या लग्नाची आणि मुलांची माहिती दडवून ठेवत दुसरे लग्न केल्याप्रकरणी गुरुवारी सिव्हिल लाईन पोलिसांनी पत्नीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दिल्ली येथे राहणारे धनराज सिरसाट (४६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कृषिनगरात राहणारी शालिनी हिचा यापूर्वी विवाह झालेला आहे. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगासुद्धा आहे; परंतु शालिनी व तिचे नातेवाईक सुरेश वानखडे, सुनील वानखडे यांनी पत्नीच्या पहिल्या लग्नाची व मुलाची माहिती लपवून ठेवत आपल्यासोबत दुसरे लग्न लावून दिले. याची माहिती मिळाल्यानंतर धनराज सिरसाट यांनी गुरुवारी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात धाव घेत, पत्नी शालिनीसह आरोपी सुरेश वानखडे व सुनील वानखडे यांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीनुसार भादंवि कलम ४0६ (३४) नुसार गुन्हा दाखल केला.
 

Web Title: First marriage and children's information hidden by another wedding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.