शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएम-किसान’च्या पहिल्या हप्त्यात २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 13:01 IST

अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपयांची मदत तीन हप्त्यात जमा करण्यात येणार आहे.

-  संतोष येलकर

अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपयांची मदत तीन हप्त्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामधील पहिल्या हप्त्याची प्रत्येकी २ हजार रुपये राज्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया ६ मार्चपासून सुरू करण्यात आली असून, यासंदर्भात लाभार्थी शेतकºयांना बँकांकडून ‘एसएमएस’ येत आहेत.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या अल्पभूधारक शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी ६ हजार रुपयांची मदत जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात गत १ फेबु्रवारी रोजी केंद्र शासनामार्फत करण्यात आली होती. त्यानुसार ‘पीएम-किसान ’ योजनेंतर्गत तीन हप्त्यात प्रत्येकी २ हजार रुपयांची रक्कम अल्पभूधारक शेतकºयांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी राज्यातील जिल्हानिहाय पात्र अल्पभूधारक शेतकºयांच्या याद्या केंद्र शासनाच्या ‘पीएम-किसान’ पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या. त्यानंतर ‘पीएम-किसान’ योजनेच्या पहिल्या हप्त्यांत प्रत्येकी २ हजार रुपयांची रक्कम शेतकºयांच्या थेट बँक खात्यात पाठविण्याची प्रक्रिया केंद्र शासनामार्फत गत आठवडाभरापासून सुरू करण्यात आली. त्यानुसार राज्यातील लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया संबंधित बँकांमार्फत ६ एप्रिलपासून सुरू करण्यात आली असून, यासंदर्भात बँकांकडून शेतकºयांना ‘एसएमएस’ पाठविण्यात येत आहेत.‘किसान पोर्टल’द्वारे येत आहेत ‘एसएमएस’!‘पीएम-किसान ’ योजनेंतर्गत २ हजार रुपयांची पहिली सन्मान रक्कम तुमच्या बँक खात्यात पाठविली आहे. दर चार महिन्यांनी मिळणाºया या रकमेने तुमच्या शेतीच्या गरजांसाठी मदत होईल, असा ‘एसएमएस’ किसान पोर्टलद्वारे लाभार्थी शेतकºयांना येत आहेत.‘पीएम-किसान’ योजनेंतर्गत केंद्र शासनामार्फत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांची पाठविलेली रक्कम संबंधित शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया ६ मार्चपासून सुरू करण्यात आली आहे.-अनंत वैद्यसीईओ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अकोला.

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाAkolaअकोलाFarmerशेतकरी