शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या प्रथम झटक्यात अमरावती विभागातील ३२ तालुके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 12:45 IST

अकोला: दुष्काळ ठरविण्याच्या निकषानुसार प्रथम कळ लागू होणाऱ्या राज्यातील २०१ तालुक्यांमध्ये अमरावती महसूल विभागातील ३२ तालुक्यांचा समावेश आहे.

- सदानंद सिरसाटअकोला: दुष्काळ ठरविण्याच्या निकषानुसार प्रथम कळ लागू होणाऱ्या राज्यातील २०१ तालुक्यांमध्ये अमरावती महसूल विभागातील ३२ तालुक्यांचा समावेश आहे. त्यामध्ये अकोल्यातील अकोट, पातूर तालुके वगळण्यात आले. उर्वरित पाच तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता मध्यम किंवा गंभीर असल्यास दुसरी कळ लागू होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.चालू वर्षातील पर्जन्यमान, पीक परिस्थिती, जलसाठे, पाणी पातळीची दृश्य स्थिती पाहता राज्यातील २०१ तालुक्यांमध्ये प्रथम टप्प्यातील दुष्काळ असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. दुष्काळाची प्रथम कळ लागू झालेल्या तालुक्यांमध्ये विभागातील ३१ पैकी पाच अकोला जिल्ह्यातील आहेत. त्यामध्ये अकोला, बाळापूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी या तालुक्यांचा समावेश आहे. शासनाने आॅक्टोबर २०१७ मध्ये दुष्काळ ठरविण्याचे निकष निश्चित केले आहेत. त्या निकषानुसार तीन टप्प्यातील तपासणी, विविध घटकांच्या अहवालावरून दुष्काळ जाहीर केला जातो. प्रत्येक टप्प्याच्या माहितीनुसारच दुसरा टप्पा निश्चित केला जातो. त्यामुळे दुष्काळाचा पहिला टप्पा म्हणजे ‘प्रथम कळ’ लागू झाली तरी दुष्काळ जाहर होईल, याची कोणतीच शाश्वती नाही. अकोला जिल्ह्यातील पाच तालुक्यातील इतर घटकांसंदर्भात अहवाल जिल्हास्तरीय समिती देणार आहे. 

जिल्हास्तरीय समिती ठरविणार दुष्काळाची तीव्रता!जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष, तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सचिव म्हणून आहेत. इतर अधिकाºयांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ भूवैज्ञानिक, महाराष्ट्र रिमोट सेंसिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटर नागपूर येथील तज्ज्ञ व्यक्ती, निवासी उपजिल्हाधिकारी, निमंत्रित सदस्य जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता ठरविणार आहेत. दुष्काळ मध्यम किंवा गंभीर ठरविला जाणार आहे.

५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान असल्यास दुष्काळज्या तालुक्यातील पिकांचे नुकसान ५० टक्क्यांपेक्षा अधिक असेल, तेथेच दुष्काळाची तीव्रता गंभीर समजली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावातील पीक परिस्थितीचा अहवाल घेणे आवश्यक आहे.

निर्देशांकानुसार ठरेल दुष्काळ!वनस्पतीशी संबंधित निर्देशांकामध्ये पीक परिस्थितीचा विचार केला जाणार आहे. सोबतच पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक आर्द्रता निर्देशांक, भूजल पातळी निर्देशांक या सर्व घटकांची तालुकानिहाय आकडेवारी गृहीत धरून दुष्काळ किती प्रभावी आहे, याचा निर्णय जिल्हास्तरीय समितीच्या अहवालावरून घेतला जाणार आहे. सद्यस्थितीत पर्जन्यमानात तूट असणे या निकषावर दुष्काळाची ‘प्रथम कळ’ लागू झाली आहे; मात्र तीव्र किंवा गंभीर दुष्काळ जाहीर होईलच, याची कोणतीही शाश्वती नसल्याचे या निकषावरून स्पष्ट होत आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAmravatiअमरावतीdroughtदुष्काळ