जिल्ह्यात तीन ठिकाणी आग; लाखोंचे नुकसान

By Admin | Updated: April 24, 2017 01:53 IST2017-04-24T01:53:09+5:302017-04-24T01:53:09+5:30

अकोला : जिल्ह्यात तीन ठिकाणी आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घडल्या. या आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले.

Fire in three places in the district; Loss of millions | जिल्ह्यात तीन ठिकाणी आग; लाखोंचे नुकसान

जिल्ह्यात तीन ठिकाणी आग; लाखोंचे नुकसान

अकोला : जिल्ह्यात तीन ठिकाणी आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घडल्या. या आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले.

अंबाशी येथे तीन घरांना आग
अंबाशी येथे तीन घरांना आग लागून ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजता घडली. गावातील राजू नामदेव मानकर व तुळशीराम काशीराम महल्ले यांच्या राहते घराला लागून असलेल्या स्वयंपाक खोलीला व बाळकृष्ण वासुदेव रोठे यांच्या गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागली. या आगीत घरातील साहित्य जळाल्याने तिघांचेही ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. आगीवर लवकर नियंत्रण मिळाल्याने पुढील अनर्थ टळले. तहसीलदार पुरी यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी अंबाशी येथे भेट देऊन पाहणी केली, तसेच तलाठी डी. एम. डाबेराव यांनी नुकसानीचा पंचनामा केला. आमदार बळीराम सिरस्कार यांनीही गावात भेट देऊन पाहणी केली. आग विझविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य युनूस पटेल, बाळासाहेब लाहोळे, नामदेव करोडदे, जनार्दन पाटील, जमीर भाई, इस्माइल शहा आदींसह ग्रामस्थांनी मदत केली. 

Web Title: Fire in three places in the district; Loss of millions