तुरीच्या गंजीला आग; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:21 IST2021-01-19T04:21:21+5:302021-01-19T04:21:21+5:30

हिवरा कोरडे येथील शेतकरी राम कोरडे यांच्या शेतशिवारात मोठ्या प्रमाणात तुरीच्या गंजी लावण्यात आल्या होत्या; परंतु अज्ञात व्यक्तीने तुरीच्या ...

Fire to the stubble; Loss of millions | तुरीच्या गंजीला आग; लाखोंचे नुकसान

तुरीच्या गंजीला आग; लाखोंचे नुकसान

हिवरा कोरडे येथील शेतकरी राम कोरडे यांच्या शेतशिवारात मोठ्या प्रमाणात तुरीच्या गंजी लावण्यात आल्या होत्या; परंतु अज्ञात व्यक्तीने तुरीच्या गंजी पेटवून दिल्याने ४० ते ५० पोते तुरीचे नुकसान झाले. सदर तुरीची किंमत चार ते पाच लाख रुपये आहे. गेल्यावर्षी सुद्धा याच परिसरात शेतकऱ्यांच्या तुरीच्या गंजी पेटवून दिल्याची घटना घडलेली आहे. आतापर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता पेटवून देणाऱ्या व्यक्तीला अभय दिलेला आहे. जर शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. मूर्तिजापूर तहसील विभागाकडून तलाठ्याने पंचनामा केलेला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी राम कोरडे यांनी केलेली आहे.

Web Title: Fire to the stubble; Loss of millions