अडत दुकानाला आग; ३ लाखांचे नुकसान
By Admin | Updated: August 5, 2014 00:53 IST2014-08-05T00:53:03+5:302014-08-05T00:53:03+5:30
चोहोट्टा बाजार येथील रुखमाई ट्रेडिंग कंपनीच्या अडत दुकानाच्या कार्यालयास भीषण आग लागली.

अडत दुकानाला आग; ३ लाखांचे नुकसान
चोहोट्टा बाजार: आकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथील रुखमाई ट्रेडिंग कंपनीच्या अडत दुकानाच्या कार्यालयास रविवार, ३ ऑगस्टच्या रात्री ९.३0 वाजता भीषण आग लागली. या आगीत रोख रकमेसह ३ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. येथील व्यापारी श्याम सुरजमल अग्रवाल यांच्या स्टेट बँकजवळच्या अडत दुकानाच्या कार्यालयात रविवारी रात्री अचानक आग लागली. दुकानातून धूर निघत असल्याचे बघून दुकानाजवळच्या लोकांनी याबाबतची माहिती अग्रवाल यांना दिली. अग्रवाल कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेऊन उपस्थितांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. तोपर्यंत आगीने दुकानाचे बरेच नुकसान केले. दुकानातील ९८ हजार ४६0 रुपये रोख व २ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. चोहोट्टा चौकीच्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.