पंरच्या दुकानास आग; ८५ हजारांचे नुकसान

By Admin | Updated: November 14, 2016 02:56 IST2016-11-14T02:56:29+5:302016-11-14T02:56:29+5:30

पोपटखेड येथील घटना.

Fire at the shop; 85 thousand losses | पंरच्या दुकानास आग; ८५ हजारांचे नुकसान

पंरच्या दुकानास आग; ८५ हजारांचे नुकसान

पोपटखेड(जि.अकोला), दि. १३- येथील पंर काढणार्‍या दुकानास आग लागल्याने ८५ हजारांचे नुकसान झाल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी रात्री ११ ते ११.३0 वाजेदरम्यान घडली.
श्रावण चंद्रभान मेश्राम यांचे पोपटखेड येथील मुख्य चौकात पंक्चर काढण्याचे दुकान आहे. या दुकानाला १२ नोव्हेंबर रोजी रात्री ११ ते ११.३0 च्या दरम्यान अचानक आग लागली. आगीमध्ये पंक्चर दुकानाचे संपूर्ण साहित्यासह कॉम्प्रेसर मशीन जळाली आहे. अंदाजे ८0 ते ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पंक्चरच्या दुकानाचे मोठे नुकसान झाल्याने त्यांचा दैनंदिन रोजगार बुडाला आहे. दुकानाला लागलेली आग विझविण्याकरिता गावातील लोकांनी तसेच भाजप आदिवासी आघाडीचे अध्यक्ष गुलाबराव वरठी यांनी मदत केली. शासनाने नुकसानाचा पंचनामा करून मदत देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Fire at the shop; 85 thousand losses