बियाणे महामंडळाच्या गोदाम परिसरात आग

By Admin | Updated: April 9, 2017 01:34 IST2017-04-09T01:34:47+5:302017-04-09T01:34:47+5:30

बियाणे महामंडळाच्या एका गोदाम परिसरात आग लागल्याची घटना शनिवारी घडली.

Fire in the Seed Corporation's warehouse area | बियाणे महामंडळाच्या गोदाम परिसरात आग

बियाणे महामंडळाच्या गोदाम परिसरात आग

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानजीक असलेल्या बियाणे महामंडळाच्या एका गोदाम परिसरात आग लागल्याची घटना शनिवारी घडली. या आगीमध्ये परिसरातील गवत जळून खाक झाले असून, मोठी हानी झाली नाही. या आगीची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन दलाच्या एका वाहनाद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे कृषी विद्यापीठानजीक दोन ते तीन गोदाम असून, यामधील एका गोदामाच्या आवारात असलेल्या गवताला शनिवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीमध्ये गोदामातील साहित्याला हानी पोहोचण्याची शक्यता होती; मात्र मनपाचे अग्निशमन विभागाचे वाहन तातडीने घटनास्थळावर पाहोचले. एक बंब पाण्याद्वारे ही आग विझविण्यात त्यांना यश आले.

Web Title: Fire in the Seed Corporation's warehouse area