सायखेड येथे घराला आग
By Admin | Updated: May 11, 2014 18:26 IST2014-05-11T18:03:26+5:302014-05-11T18:26:27+5:30
शॉर्टसर्किटमुळे आग लागून घरातील सामान जळून खाक

सायखेड येथे घराला आग
सायखेड : येथील एका आदिवासी महिलेच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून घरातील सामान जळून खाक झाल्याची घटना शनिवार, १० मे च्या रात्री घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सायखेड येथे रत्ना राजू शिंदे यांचे घर आहे. शनिवारी रात्री दहा वाजताचे सुमारास त्यांच्या घरावरील विद्युत पुरवठ्याच्या केबलमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे घरावर ठिणगी पडली व पाहता-पाहता घराने पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच गावकर्यांनी आग विझविली. या आगीत रत्ना शिंदे यांच्या घरातील कपडे, धान्य व इतर आवश्यक वस्तू जळून खाक झाल्या. संबंधित विभागाने या घटनेचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सदर महिलेने केली आहे. (वार्ताहर) 12सीटीसीएल18
कॅप्शन- आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले घरातील सामान.