मुर्तिजापुरात जिनिंग फॅक्टरीला आग
By Admin | Updated: December 25, 2014 00:55 IST2014-12-25T00:55:16+5:302014-12-25T00:55:16+5:30
नऊ लाखांचे नुकसान.

मुर्तिजापुरात जिनिंग फॅक्टरीला आग
मूर्तिजापूर (अकोला): दर्यापूर मार्गावरील देवाशीष जिनिंग अँड प्रेसिंगला आग लागून कापूस व मशीन जळून खाक झाल्याची घटना बुधवार, २४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. आगीत तब्बल नऊ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
पुंडलिकनगर परिसरात देवाशीष जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी असून, त्या ठिकाणी व्यंकटेश बेस प्रोसेस कंपनीचा कापूस व मशीन आहेत. बुधवारी या फॅक्टरीला अचानक आग लागली. पाहता -पाहता आगीने उग्र रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळावर धाव घेतली. अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांनी आग आटोक्यात आणली. आगीत २00 ते २५0 क्विंटल कापूस व मशीन जळून खाक झाल्याची माहिती फॅक्टरीच्या मालकांनी दिली. या आगीमुळे अंदाजे नऊ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाचे रवि तिवारी, विजय मोहोड, नारायण खडसे, शेर मुजिब, व्यंकटेश जिनिंगचे जयकिशन डागा, पुरुषोत्तम डागा, साहिल डागा व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.