आकोट स्टॅन्डवरील गॅरेजला आग

By Admin | Updated: July 13, 2015 02:00 IST2015-07-13T02:00:08+5:302015-07-13T02:00:08+5:30

तीन बंबाद्वारे आगीवर नियंत्रण.

Fire on Garage stand at Akot stand | आकोट स्टॅन्डवरील गॅरेजला आग

आकोट स्टॅन्डवरील गॅरेजला आग

अकोला - आकोट स्टॅन्डवर असलेल्या जनता गॅरेजला आग लागल्याची घटना रविवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास घडली. या आगीमध्ये गॅरेजमधील साहित्य जळून खाक झाले असून, आग नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे तीन बंब पाठविण्यात आले होते. आकोट स्टॅन्डवर जनता गॅरेज असून या गॅरेजला रविवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. गॅरेजला आग लागल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाद्वारे पाण्याचा एक बंब पाठविण्यात आला. मात्र आग आटोक्यात न आल्यामुळे अग्निशमन विभागाचे आणखी दोन बंब घटनास्थळी पाठविण्यात आले. त्यानंतर रात्री १२ वाजताच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत जनता गॅरेजमधील साहित्य जळून खाक झाले होते.

Web Title: Fire on Garage stand at Akot stand