शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कापसाने भरलेल्या वाहनाला आग: २० क्विंटल कापसाची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 15:40 IST

हातरुण - वाहनात भरलेल्या २० क्विंटल कापसाला अचानक आग लागल्याने वाहनासह कापसाची राखरांगोळी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी हातरुण येथे घडली. या आगीमुळे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे२ लाखाचे नुकसानहातरुण येथील घटना

- संतोष गव्हाळे

हातरुण - वाहनात भरलेल्या २० क्विंटल कापसाला अचानक आग लागल्याने वाहनासह कापसाची राखरांगोळी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी हातरुण येथे घडली. या आगीमुळे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हातरुण येथील शेतकरी सुभाषचंद्र अग्रवाल यांनी शेतातील कापूस बुधवारी रात्री टाटा एस एम एच ०४ - डी. एस. ३५३९ या वाहनात भरून ठेवला होता. या वाहनात २० क्विंटल कापूस होता. गुरुवारी सकाळी  या कापूस भरलेल्या वाहनाला अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात धूर निघतांना दिसून आला. या गाडीवर असलेले टायर (स्टेपनी) आगीमुळे वर उडून टिनावर पडले.त्यामुळे आवाज झाल्याने बाजूने राहणारा अजय गिरी युवकाने गाडीकडे धाव घेतली असता गाडीने पेटलेली दिसून आली. अजय गिरी या युवकांसह चार ते पाच जणांनी मोठया प्रमाणात पाणी टाकून आग विझवली. मात्र या आगीत इंजिनसह गाडी व कापूस खाक झाला. या घटनेची माहिती मिळताच हातरुण चे तलाठी दत्तात्रय काळे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या जळलेल्या गाडीचे दीड लाखाचे व शेतकरी सुभाषचंद्र अग्रवाल यांच्या कापसाचे ४० हजार असे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. या घटनास्थळाची हातरुण पोलीस चौकीचे बिट जमादार विजय चव्हाण आणि सुरेश कुंभारे यांनी पाहणी करून तपास सुरू केला आहे. नुकसानग्रस्त शेतकरी सुभाषचंद्र अग्रवाल, अनिल अग्रवाल, माजी पंचायत समिती सदस्य मंजूर शाह, गजानन नसुर्डे उपस्थित होते.

टॅग्स :Accidentअपघातfireआग