सस्ती येथे शॉर्ट सर्किटमुळे कृषी केंद्राला आग
By Admin | Updated: March 31, 2017 01:48 IST2017-03-31T01:48:44+5:302017-03-31T01:48:44+5:30
आगीत १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सस्ती येथे शॉर्ट सर्किटमुळे कृषी केंद्राला आग
दिग्रस बु. (जि. अकोला), दि. ३0- नजीकच्या सस्ती येथे गुरुवार रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास बळीराजा कृषी सेवा केंद्राला आग लागली. या आगीत १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सस्तीमधील श्रीकृष्ण भगत यांनी भाडेतत्त्वावर मोहन नागपुरे यांना कृषी सेवा केंद्र चालविण्यासाठी जागा दिली होती. या दुकानामध्ये मोहन नागपुरे हे सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंंत विक्री करीत होते. त्यानंतर ते जेवण करण्यासाठी घरी गेले असता, त्या दुकानातून धूर निघत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. यावेळी गावातील लोकांनी धावपळ करून आग विझण्याचा प्रयत्न केला; परंतु दुकानाचे कुलूप उघडेपर्यंत पूर्ण दुकानातून आगीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. यावेळी ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्यांना बोलावले; परंतु अग्निशामक दलाच्या गाड्या आग आटोक्यात आल्यावर पोहोचल्या.
या दुकानात कीटकनाशक , १५ पोते तूर, शेतीचे साहित्य व २५ हजार रुपयांच्या नोटांचे बंडल होते. या आगीत १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तलाठय़ाने पंचनाम्यात नमूद केले. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख नितीन देशमुख, गावातील सरपंच, चान्नीचे पोलीस, तलाठी, तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी घटनास्थळाला भेट दिली.