शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक गैरव्यवहार: मारसूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 13:51 IST

मालेगाव (वाशिम) : अधिकाराचा गैरवापर करून ५ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मालेगाव तालुक्यातील मारसूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिलीप शामराव वाहोकार यांना सेवेतून निलंबित करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : अधिकाराचा गैरवापर करून ५ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मालेगाव तालुक्यातील मारसूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिलीप शामराव वाहोकार यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ४ फेब्रुवारीला ही धडक कारवाई केली. प्राप्त माहितीनुसार, मारसूळ ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगांतर्गत मिळालेल्या निधीतून केलेल्या कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार अभिराज अशोकराव घुगे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे केली होती. त्यावरून जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे अहवाल सादर केला. ग्रामपंचायतीने अंदाजपत्रकातील तरतूदीनुसार कामे न करता चुकीच्या पद्धतीने खर्च करून अनियमितता केली आहे. अंगणवाडी दुरुस्ती, शौचालय दुरुस्ती, शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली लाखो रुपयांच्या निधीची अफरातफर केली. यासह सरपंच, सचिव यांनी ५ लाख ४२ हजार ५०० रुपयांच्या रक्कमा स्वत:च्या नावे काढून महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता नियम २४ (१) चे उल्लंघन केले आहे. अंदाजपत्रकानुसार कामे केली नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) अधिनियम १९६४ मधील नियम ३ (१) नुसार आर्थिक गैरव्यवहार करणे आणि कर्तव्यात करूर केल्याचा ठपका ठेवून ग्रामसेवक दिलीप वाहोकार यांना निलंबित करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, या धडक कारवाईमुळे बेजबाबदारपणाचे धोरण अंगिकारणाºया जिल्ह्यातील इतर ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतsuspensionनिलंबन