शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

रमाई घरकुल लाभार्थींची आर्थिक लूट; अधिकारी-कर्मचारी उकळतात रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 13:52 IST

अकोला: सामाजिक न्याय विभागाकडून शहरी आणि ग्रामीण भागातील अनुसूचित जातींच्या लाभार्थींसाठी असलेल्या रमाई घरकुल योजना शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कुरण ठरत आहे.

ठळक मुद्देघरकुल मंजूर करण्यापासून ते निधी खात्यात वळता करेपर्यंत ग्रामीणमध्ये १० ते १५ तर शहरी भागात २० हजारांपेक्षाही अधिक रक्कम उकळण्याचा सपाटा सुरू झाला आहे.नगर परिषद क्षेत्रातील २३०० पेक्षाही अधिक घरकुलांना मंजुरीस विलंब सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. बाळापूर पंचायत समितीमधील एका गावातील लाभार्थीकडून १ ते १.५० लाख रुपये वसूल केल्याचा प्रकारही घडला आहे.

अकोला: सामाजिक न्याय विभागाकडून शहरी आणि ग्रामीण भागातील अनुसूचित जातींच्या लाभार्थींसाठी असलेल्या रमाई घरकुल योजना शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कुरण ठरत आहे. घरकुल मंजूर करण्यापासून ते निधी खात्यात वळता करेपर्यंत ग्रामीणमध्ये १० ते १५ तर शहरी भागात २० हजारांपेक्षाही अधिक रक्कम उकळण्याचा सपाटा सुरू झाला आहे. त्यामुळेच नगर परिषद क्षेत्रातील २३०० पेक्षाही अधिक घरकुलांना मंजुरीस विलंब सुरू असल्याचे चित्र अकोला जिल्ह्यात आहे.शासनाच्या सर्वांना घरे संकल्पनेनुसार सर्वसाधारण लाभार्थींसाठी प्रधानमंत्री आवास, आदिवासींसाठी शबरी आवास, अनुसूचित जातींसाठी रमाई आवास योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात ग्रामीण विकास यंत्रणेच्या नियंत्रणात ग्रामसेवक, सरपंचाकडून लाभार्थी निवड केली जाते, तर शहरी भागात नगर परिषद प्रशासनाकडून घरकुल मंजूर केले जातात. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पंचायत समित्यांमधील विस्तार अधिकाºयांना हाताशी धरून ग्रामसेवक, सरपंच, सदस्यांकडून रमाई आवास योजनेतील घरकुलासाठी आर्थिक पिळवणूक सुरू आहे. किमान दहा ते पंधरा हजार रुपये उकळल्यानंतरच घरकुलाचा लाभ देण्याचा सपाटा सुरू आहे. त्यासाठी शेकडो लाभार्थींची अडवणूकही केली जात आहे. बाळापूर पंचायत समितीमधील एका गावातील लाभार्थीकडून १ ते १.५० लाख रुपये वसूल केल्याचा प्रकारही घडला आहे. शहरी भागातही तोच प्रकारनगर परिषद क्षेत्रासाठी समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी निधी ३ मार्च २०१८ रोजीच वितरित केला आहे. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद प्रशासन विभागाचे नियंत्रण आहे. लाभार्थींची निवड आणि घरकुलाची निधी देण्याची जबाबदारी नगर परिषदांवर आहे; मात्र जिल्ह्यातील पाच नगर परिषद क्षेत्रात घरकुल लाभार्थींच्या खात्यावर निधी वाटप करण्यास दोन महिन्यांपासून टाळाटाळ सुरू आहे. लाभार्थींकडून आर्थिक फायदा झाल्यास तातडीने निधी दिला जातो.  पावसाळ्यात कामे कशी करणार?नगर परिषद क्षेत्रातील घरकुल लाभार्थींना आता उशिरा निधी वाटप केल्यास पावसाळ्यात बांधकाम कसे करावे, ही समस्या उभी ठाकणार आहे; मात्र नगर परिषद प्रशासनाकडून मुद्दामपणे दिरंगाईचा प्रकार घडत आहे. घरकुलाची कामे वेळेत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी नगर परिषदेवर आहे. ते न झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाºयांनी दिलेला आहे. घरकुलाचा निधी वाटप केला आहे. नगर परिषदेने तातडीने लाभार्थींना देऊन कामे पूर्ण करावी, जिल्हाधिकारी कार्यालयातून कामे सुरू करण्याबाबत वेगळा आदेश दिला जात नाही.- अमोल यावलीकर, सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदBalapurबाळापूर