अखेर सिटी बसचा ठराव होणार रद्द

By Admin | Updated: November 4, 2015 02:46 IST2015-11-04T02:46:26+5:302015-11-04T02:46:26+5:30

७ नोव्हेंबर रोजी सर्वसाधारण सभेत प्रस्ताव

Finally, the resolution of the city bus will be canceled | अखेर सिटी बसचा ठराव होणार रद्द

अखेर सिटी बसचा ठराव होणार रद्द

अकोला: अकोलेकरांच्या सोयीसाठी शहर बस वाहतूक सेवा सुरू करण्याचा महापालिका प्रशासनाचा करार संशयास्पद असल्याची बाब उघडकीस आली. सिटी बस सेवेचा ठराव आयुक्तांनी मंजूर करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी कमालीचे आग्रही होते. हा करार मनपाच्या हिताच्या आड येत असल्याबाबतचे वृत्त ह्यलोकमतह्णने सतत प्रकाशित केल्यानंतर शिवसेनेनेसुद्धा करार रद्द करण्यासाठी दंड थोपटले. अखेर हा ठराव रद्द करून येत्या ७ नोव्हेंबर रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शहर बस वाहतूक करणारी सेवा सहकारी सोसायटी दिवाळखोरीत निघाल्यामुळे मनपाने तात्पुरत्या कालावधीसाठी बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. निश्‍चितच बस वाहतूक सेवा सुरू झाल्यास सर्वसामान्य अकोलेकरांची परवड थांबणार आहे. त्यानुषंगाने सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या निर्देशानुसार मोटार वाहन विभागाने नवीन सिटी बससाठी निविदा प्रक्रिया राबवली. ही प्रक्रि या पारदश्री ठेवण्याची जबाबदारी मोटार वाहन विभागाची असताना याठिकाणी नेमका उलटा प्रकार झाला. मोटार वाहन विभागाने श्री कृपा ट्रॅव्हल्सची निविदा मंजूर करीत सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव मांडला. या विषयावर २ सप्टेंबर रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत भाजपचे गटनेता हरीश आलीमचंदानी यांनी अवघ्या दहा मिनिटांत चर्चा केली आणि महापौरांनी श्री कृपा ट्रॅव्हल्सच्या निविदेला मंजुरी दिली; परंतु या करारात सिटी बससाठी मनपा प्रशासन जामीन राहणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले. हा प्रकार कालांतराने उघडकीस आल्यानंतर या विषयावर मित्रपक्ष शिवसेनेने आक्षेप नोंदवत भाजपाने मंजूर केलेला ठराव विखंडित करण्याची मागणी आयुक्तांकडे लावून धरली.

Web Title: Finally, the resolution of the city bus will be canceled