अखेर रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन कांबळे गजाआड

By Admin | Updated: December 13, 2014 00:47 IST2014-12-13T00:47:00+5:302014-12-13T00:47:00+5:30

अकोल्यातील धोपेकर हत्याकांड प्रकरण.

Finally, the municipal head of the RPG Gajanan Kamble Gajaad | अखेर रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन कांबळे गजाआड

अखेर रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन कांबळे गजाआड

अकोला: पातूर रोडवरील जयराज वाईन बारमधील कर्मचारी सुनील धोपेकर याच्या हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन काशीनाथ कांबळे (३८) याला जुने शहर पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री अटक केली.
बिलाचे पैसे देण्याच्या वादातून सतीश खंडारे, सागर उपर्वट, नीतेश गुलाबराव खंडारे, विवेक प्रकाश इंगळे यांनी बारमधील कर्मचारी सुनील धोपेकर यास चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी घडली होती. घटनेपूर्वी रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन कांबळे याने बारमधील भूषण महादेव इंगळे (३५) याला मोबाईलवरून धमकी दिली होती. त्यानंतर कांबळे याच्या सहकार्‍यांनी बिल देण्यावरून वाद घालून वाईन बारमधील कर्मचारी सुनील धोपेकर यास चाकू भोसकून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी पोलिसांनी गजानन कांबळे यास अटकही केली होती; परंतु त्याची जामिनावर सुटका झाली होती. उपचारादरम्यान सुनीलचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी गजानन कांबळे याच्यासह त्याच्या सर्व सहकार्‍यांविरुद्ध भादंवि कलम ३0२ (३४) नुसार गुन्हा दाखल करून त्याच्या चारही सहकार्‍यांना अटक केली होती. गजानन कांबळे हा फरार झाला होता. गुरुवारी रात्री जुने शहरचे ठाणेदार रियाज शेख यांना पोलिसांनी सापळा रचून, मोठय़ा शिताफीने त्याला अटक केली.

Web Title: Finally, the municipal head of the RPG Gajanan Kamble Gajaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.