शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

अखेर 'हमसफर एक्स्प्रेस'ला अकोल्यात मिळाला थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 14:20 IST

अकोला : पुणे-नागपूर आणि पुणे-अजनी दोन साप्ताहिक हमसफर सुपरफास्ट रेल्वे एक्स्प्रेसला अखेर अकोल्यात थांबा मिळाला आहे.

अकोला : पुणे-नागपूर आणि पुणे-अजनी दोन साप्ताहिक हमसफर सुपरफास्ट रेल्वे एक्स्प्रेसला अखेर अकोल्यात थांबा मिळाला आहे. रेल्वे मंत्रालयाने नव्याने सुरू केलेल्या या दोन्ही रेल्वेगाड्यांना थांबा नसल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशझोतात आणले होते. या वृत्ताची दखल अकोल्याचे खासदार संजय धोत्रे आणि उद्योजक वसंत खंडेलवाल यांनी घेतली. हमसफर एक्स्प्रेसला अकोला आणि वर्धा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे झाल्यानंतर या गाडीला थांबा मिळाला.पुणे-नागपूर आणि पुणे-अजनी दोन्ही साप्ताहिक हमसफर सुपरफास्ट एक्स्प्रेस आठवड्याच्या दर गुरुवारी आणि शनिवारी सुरू होत आहेत. शनिवारपासून या दोन नव्या रेल्वेगाड्या पुण्याहून धावणार आहेत. या दोन्ही रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पंधरवड्यापूर्वीच जाहीर झाले होते. नव्याने सुरू होणाऱ्या ११४१९/११४२० पुणे ते नागपूर आणि ११४१७/११४१८ पुणे ते अजनी या दोन साप्ताहिक हमसफर रेल्वेगाड्यांना दौंड, मनमाड, भुसावळ आणि बडनेरा या चार स्थानकांवर थांबा दर्शविण्यात आला होता. अकोला मार्गे धावणाºया दोन्ही रेल्वेगाड्यांना अकोल्यात थांबा नसल्याने अकोलेकरांचा हिरमोड झाला होता. अकोला रेल्वेस्थानकावर दोन्ही गाड्यांना थांबा नसल्याने या गाड्यांचा लाभ अकोलेकरांना मिळणार नाही. देशातील रेल्वे आरक्षणातील प्रमुख १०० स्थानकांमध्ये अकोला स्थानक असले तरी थांब्यामध्ये मात्र अकोल्याला स्थान नाही. अशा आशयाचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रकाशझोतात आणले. त्या वृत्ताची गंभीर दखल अकोल्याचे खासदार संजय धोत्रे आणि उद्योजक वसंत खंडेलवाल यांनी घेतली. दोघांनीही यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर गुरुवारी भुसावळ रेल्वे विभाग आणि अकोला रेल्वेस्थानकावर थांबा मिळाल्याचा मेल धडकला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानकrailwayरेल्वे