अखेर ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या वेतनासाठी अडीच कोटी मिळाले !

By Admin | Updated: October 15, 2016 03:10 IST2016-10-15T03:10:43+5:302016-10-15T03:10:43+5:30

अकोला जिल्हय़ातील ९९१ ग्रामपंचायत कर्मचा-यांना मिळणार लाभ.

Finally, the gram panchayat employees got 2.5 crore for the wages! | अखेर ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या वेतनासाठी अडीच कोटी मिळाले !

अखेर ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या वेतनासाठी अडीच कोटी मिळाले !

अकोला, दि. १४- जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी अखेर शासनामार्फत २ कोटी ६७ लाख ५८ हजार ६२४ रुपयांचे अनुदान अखेर १0 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. हा निधी लवकरच पंचायत समिती स्तरावर वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे गत पाच महिन्यांपासून वेतनापासून वंचित असलेल्या जिल्हय़ातील ९९१ ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना वेतनाचा लाभ मिळणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत कर्मचार्‍यांना घर, पाणी, दिवाबत्ती आणि आरोग्य इत्यादी ग्रामपंचायत कर वसुली, ग्रामपंचायत व गावातील नाल्या सफाई, नमुना-८ तयार करणे, गावातील जन्म-मृत्यूच्या नोंदी घेणे व दाखले तयार करणे आणि ग्रामसभा व ग्रामपंचायतीच्या मासिक सभेच्या नोटीस ग्रामपंचायत सदस्यांना पोहोचविणे इत्यादी कामे करावी लागतात. या कामापोटी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना दरमहा ५ हजार १00 रुपये वेतन दिले जाते. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतनाचा ५0 टक्के खर्च ग्रामपंचायत आणि ५0 टक्के खर्च शासनामार्फत सहायक अनुदान निधीतून भागविला जातो. अकोला जिल्हय़ातील सातही तालुक्यांत ९९१ कर्मचारी कार्यरत आहेत. सन २0१६-१७ या वर्षात जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी ३ कोटी ४१ लाख ६९ हजार ३00 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत गत ऑक्टोबर २0१५ मध्ये शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे पाठविण्यात आला; मात्र शासनामार्फत निधी उपलब्ध झाला नसल्याने, गत एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांचे जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन रखडले होते. त्यामुळे वेतनापोटी सहायक अनुदानाचा निधी शासनामार्फत केव्हा मिळणार, याबाबत ग्रामपंचायत कर्मचार्‍यांकडून प्रतीक्षा केली जात होती. या पृष्ठभूमीवर ह्यनिधीत अडकले ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतनह्ण याबाबत ह्यलोकमतह्णमध्ये गत १४ सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित झाले होते, हे विशेष. अखेर जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतनापोटी शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत २ कोटी ६७ लाख ५८ हजार ६२४ रुपयांचे सहायक अनुदान १0 ऑक्टोबर रोजी प्राप्त झाले. उपलब्ध अनुदान जिल्हय़ातील सातही पंचायत समिती स्तरावर वितरित करण्यात येणार असून, पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना वेतनाची रक्कम वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे गत सहा महिन्यांपासून वेतनाविना असलेल्या जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी वेतनाचा लाभ मिळणार आहे.

Web Title: Finally, the gram panchayat employees got 2.5 crore for the wages!