अखेर विहित नमुन्यात जात प्रमाणपत्रांचे वितरण सुरू
By Admin | Updated: July 22, 2014 00:40 IST2014-07-22T00:40:24+5:302014-07-22T00:40:24+5:30
विहित नमुन्यात जातीच्या प्रमाणपत्रांचे वितरण सुरू करण्यात आले.

अखेर विहित नमुन्यात जात प्रमाणपत्रांचे वितरण सुरू
अकोला : उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी दिलेल्या निर्देशानंतर, अकोल्यातील सेतू केंद्रांमार्फत अखेर सोमवारपासून विहित नमुन्यात जातीच्या प्रमाणपत्रांचे वितरण सुरू करण्यात आले. महसूल अधिकार्यांच्या स्वाक्षरीने दिल्या जाणार्या जातीच्या प्रमाणपत्रांसाठी राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत जातीच्या प्रवर्गनिहाय विहित नमुना क्रमांक निश्चित करण्यात आले आहेत; परंतु अकोल्यातील काही सेतू केंद्रांकडून जातीचे प्रमाणपत्र विहित नमुन्यांऐवजी चुकीच्या व जुन्या नमुन्यात दिले जात आहेत. तसेच विहित नमुना क्रमांकाविनाच जातीचे प्रमाणपत्र दिले जात असून, विहित नमुना क्रमांक पाहून जातीचे प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी असलेल्या अधिकार्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. या आशयाचे वृत्त रविवार, २0 जुलै रोजी ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे व तहसीलदार संतोष शिंदे यांनी सेतू केंद्रांमार्फत दिल्या जाणार्या जातीच्या प्रमाणपत्रांचे ह्यऑनलाईनह्ण नमुने काढून तपासणी केली. तसेच जातीच्या प्रवर्गनिहाय निश्चित करण्यात आलेल्या विहित नमुना क्रमांकासह आणि अद्ययावत नमुन्यात जातीचे प्रमाणपत्र देण्याचे निर्देश अकोला उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांमार्फत शहरातील सेतू केंद्रांना देण्यात आले. त्यानंतर सोमवार, २१ जुलैपासून सेतू केंद्रांमार्फत विहित नमुन्यात व विहित क्रमांकासह अद्ययावत स्वरूपातील जातीच्या प्रमाणपत्रांचे वितरण सुरू करण्यात आले.