....अखेर बेपत्ता आलीयाचा मृतदेहच सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 15:10 IST2017-09-10T15:09:35+5:302017-09-10T15:10:12+5:30

Finally, the dead body was found | ....अखेर बेपत्ता आलीयाचा मृतदेहच सापडला

....अखेर बेपत्ता आलीयाचा मृतदेहच सापडला

अकोला : गत शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या अकोल्यातील नायगाव परिसरातील पाच वर्षीय आलिया परवीन या बालीकेचा अखेर रविवारी मृतदेहच सापडला. नायगाव डम्पिंग ग्राऊंडवर रविववारी सकाळी एका पोतडीत आलीयाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. आलीयाच्या वडीलांच्या फिर्यादीवरून आकोट फैल पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. नायगाव परिसरातील सिद्धार्थवाडी येथील शे. फिरोज शे. रशिद यांची ५ वर्षीय मुलगी आलिया परविन ही शुक्रवारी सायंकाळी अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबियांनी तीचा सर्वत्र शोध घेतला; परंतु तीचा पत्ता लागला नाही. अखेर त्यांनी मुलगी हरविल्याची तक्रार आकोट फैल पोलिसांत केली. दरम्यान, रविवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या घरापासून सुमारे १५० मीटर अंतरावर असलेल्या डम्पिंग ग्राऊंड परिसरातील नाल्यात एक पोतडी नागरिकांना दिसून आली. यामध्ये एका मुलीचा मृतदेह होता. सदर मृतदेह आलीयाचा असल्याची ओळख पटविण्यात आली.

Web Title: Finally, the dead body was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.