शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेर रिलायन्स कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 02:38 IST

रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने मनपाची ९00 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फोडल्याने मनपा प्रशासनाने कंपनीला बारा लाखांचा दंड ठोठावला होता; परंतु दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणार्‍या कंपनीविरुद्ध मनपा प्रशासनाने खदान पोलीस ठाण्यात तक्रार केली. खदान पोलिसांनी रात्री उशिरा रिलायन्स कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

ठळक मुद्देजलवाहिनी फोडल्याची बारा लाख रुपये नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : फोर-जी केबल टाकण्यासाठी खोदकाम करणार्‍या रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने मनपाची ९00 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फोडल्याने मनपा प्रशासनाने कंपनीला बारा लाखांचा दंड ठोठावला होता; परंतु दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणार्‍या कंपनीविरुद्ध मनपा प्रशासनाने खदान पोलीस ठाण्यात तक्रार केली. खदान पोलिसांनी रात्री उशिरा रिलायन्स कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला. कौलखेड, खडकी परिसरात रिलायन्स कंपनीने फोर-जी केबल टाकण्यासाठी खोदकाम करताना करण्यात आले. २२ सप्टेंबर रोजी शहराला पाणी पुरवठा करणारी ९00 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फोडली. त्यामुळे शहराला होणारा पाणी पुरवठा खंडित झाला होता. पाइपलाइन फुटल्यामुळे लाखो लीटर पाणीसुद्धा वाहून गेले होते. या प्रकरणाची दखल घेत महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने रिलायन्स कंपनीला पत्र पाठवून जलवाहिनी दुरुस्तीसाठी आठ लाख रुपये आणि पाण्याच्या अपव्यय झाल्यामुळे चार लाख रुपये असा एकू ण बारा लाखांचा दंड आकारला होता. दीड महिना उलटून गेल्यानंतरही रिलायन्स कंपनीने मनपाकडे दंडाची रक्कम जमा केली नाही. दंडाची रक्कम जमा करण्यास रिलायन्स कंपनी टाळाटाळ करीत होती, तसेच मनपा प्रशासनाकडूनही कंपनीला कोणताही जाब विचारण्यात येत नसल्याने, मनपाच्या अधिकार्‍यांच्या कार्यशैलीवर भाजपचे नगरसेवक विजय इंगळे यांनी आरोप केला होता. ‘लोकमत’नेसुद्धा बुधवारी रिलायन्स कंपनीने दंडाची रक्कम भरलीच नसल्याचे वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे झोपेतून जागे झालेल्या मनपा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, कनिष्ठ अभियंता नरेश बावणे यांनी बुधवारी सायंकाळी रिलायन्स कंपनीविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीनुसार खदान पोलिसांनी रात्री उशिरा कंपनीविरुद्ध सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधिनियम १९८४ आणि कलम ४२७ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले करणार आहेत.  

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओ