शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची अंतिम पडताळणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:54 PM

उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची अंतिम पडताळणी निवडणूक निरीक्षक (खर्च विषयक) नागेंद्र यादव यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात केली.

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविलेल्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची अंतिम पडताळणी निवडणूक निरीक्षक (खर्च विषयक) नागेंद्र यादव यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात केली असून, निवडणूक खर्चाची अंतिम माहिती सादर करण्याची मुदत २१ जूनपर्यंत आहे.अकोला लोकसभा मतदारसंघात ११ उमेदवारांनी निवडणूक लढविली असून, निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी जाहीर करण्यात आला. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी ३० दिवसांत निवडणूक खर्चाचे अंतिम विवरण सादर करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने १८ जूनपर्यंत १० उमेदवारांकडून सादर करण्यात आलेल्या निवडणूक अंतिम खर्चाची पडताळणी निवडणूक निरीक्षक नागेंद्र यादव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केली. यावेळी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा कोषागार अधिकारी माधव झुंजारे, संतोष सोनी यांच्यासह उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक लढविलेल्या ११ पैकी १० उमेदवारांकडून सादर करण्यात आलेल्या निवडणूक खर्चाच्या अंतिम माहितीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये भाजपाचे संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल, बसपाचे बी. सी. कांबळे, पीपल्स पार्टी आॅफ इंडिया (डेमोक्रेटिक)चे अरुण वानखडे, बहुजन मुक्ती पार्टीच्या प्रवीणा भटकर, अपक्ष गजानन हरणे, अपक्ष अरुण ठाकरे, अपक्ष प्रवीण कौरपुरिया, अपक्ष मुरलीधर पवार व अपक्ष सचिन शर्मा इत्यादी १० निवडणूक खर्चाची अंतिम पडताळणी करण्यात आली असून, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या निवडणूक खर्चाची अंतिम माहिती एक-दोन दिवसात सादर करण्यात येणार आहे.दहा उमेदवारांकडून सादर करण्यात आलेला असा आहे निवडणूक खर्च!अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविलेल्या ११ पैकी १० उमेदवारांकडून मतमोजणीपर्यंत केलेल्या निवडणूक खर्चाची अंतिम माहिती सादर करण्यात आली आहे. त्यानुसार भाजपाचे उमेदवार तथा केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे -५२ लाख ४९ हजार ५०७ रुपये, काँग्रेसचे हिदायत पटेल -४७ लाख ३१ हजार २०७ रुपये, बसपाचे बी.सी. कांबळे -९४ हजार ५३० रुपये, पिपाइंचे अरुण वानखडे -१ लाख ३२ हजार ८३७ रुपये, बमुपाच्या प्रवीणा भटकर -२ लाख ८५ हजार ६१ रुपये, अपक्ष गजानन हरणे -३३ हजार ९६० रुपये, अपक्ष अरुण ठाकरे-२८ हजार ९५ रुपये, अपक्ष प्रवीण कौरपुरिया -३९ हजार ८५९ रुपये, अपक्ष मुरलीधर पवार-२९ हजार ९३२ रुपये आणि अपक्ष सचिन शर्मा यांनी ७१ हजार ९८६ रुपयांचा निवडणूक खर्च सादर केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९akola-pcअकोला