मंजूर ठरावांविरोधात अपिलावरील अंतिम सुनावणी पूर्ण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:24 IST2021-08-25T04:24:50+5:302021-08-25T04:24:50+5:30
अकोला: जिल्हा परिषदेच्या गत २३ जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या विविध ठरावांविरोधात विरोधकांनी दाखल केलेल्या अपिलावर अंतिम ...

मंजूर ठरावांविरोधात अपिलावरील अंतिम सुनावणी पूर्ण !
अकोला: जिल्हा परिषदेच्या गत २३ जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या विविध ठरावांविरोधात विरोधकांनी दाखल केलेल्या अपिलावर अंतिम सुनावणी मंगळवार, २४ ऑगस्ट रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात पूर्ण करण्यात आली. अपिलावरील आदेश विभागीय आयुक्तांकडून लवकरच पारित करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने विभागीय आयुक्तांकडून पारित होणाऱ्या आदेशाकडे जिल्हा परिषद वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा २३ जून रोजी घेण्यात आली. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांची आचारसंहिता लागू असताना, त्यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध ठराव मंजूर करण्यात आल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार करीत, यासंदर्भात जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांच्या वतीने गटनेता गोपाल दातकर व डाॅ. प्रशांत अढाऊ यांनी अमरावती विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. या अपिलावर २४ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्तांनी अंतिम सुनावणी घेतली. त्यामध्ये अपीलकर्ता आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने विधिज्ञांचे मत नोंदविण्यात आले असून, सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. विभागीय आयुक्तांकडून अपिलावरील आदेश लवकरच पारित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांकडून काय आदेश पारित होतो, याकडे आता जिल्हा परिषद वर्तुळाचे लक्ष लागले आहे.