नोएल इंग्लिश व माऊंट कारमेल संघातअंतिम टक्कर

By Admin | Updated: January 29, 2015 00:37 IST2015-01-29T00:37:43+5:302015-01-29T00:37:43+5:30

अकोला येथील लोकमत आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा आज समारोप.

Final collision in Noel English and Mount Carmel Association | नोएल इंग्लिश व माऊंट कारमेल संघातअंतिम टक्कर

नोएल इंग्लिश व माऊंट कारमेल संघातअंतिम टक्कर

अकोला: श्री नाना उजवणे मंडप कॉन्ट्रॅक्टर व डेकोरेशन प्रस्तुत लोकमत आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यफेरीतील सामने बुधवारी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर खेळण्यात आले. यामध्ये नोएल इंग्लिश स्कूल व माऊंट कारमेल हायस्कूल संघाने विजय मिळवून, अंतिम सामन्यासाठी पात्रता सिद्ध केली. अंतिम सामन्याला गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळी ९.३0 वाजता सुरुवात होणार आहे.
पहिला उपांत्य सामना नोएल इंग्लिश हायस्कूल व हिंदू ज्ञानपीठ कॉन्व्हेंट यांच्यात झाला. नोएल इंग्लिश संघाने नाणेफेक जिंकून, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हिंदू ज्ञानपीठने फलंदाजी स्वीकारत सर्वबाद ६७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात नोएल स्कूलने निर्धारित धावांचे लक्ष्य अवघ्या ८.५ षटकातच पूर्ण करीत ९ गड्यांनी विजय मिळवून, अंतिम सामन्यासाठी सज्ज झाला. नोएल स्कूलच्या आकाश हेडाऊ याने नाबाद ४१ धावांचे योगदान देत सामनावीरचा पुरस्कार मिळविला. पॅरामाऊंट स्पोर्टस्चे संचालक जावेद अली यांच्या हस्ते आकाशला स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. याप्रसंगी नोएल स्कूलचे क्रीडा शिक्षक शरद पवार व हिंदू ज्ञानपीठचे पंकज गाढे उपस्थित होते.

Web Title: Final collision in Noel English and Mount Carmel Association