विझोरा, कातखेड येथील रिक्त पोलीस पाटील पद भरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:22 IST2021-09-22T04:22:04+5:302021-09-22T04:22:04+5:30

पोलीस विभाग संबंधित हे पद असून, गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस पाटील यांच्यावर असते. या शिवाय शालेय ...

Fill the vacant Police Patil post at Vizora, Katkhed! | विझोरा, कातखेड येथील रिक्त पोलीस पाटील पद भरा!

विझोरा, कातखेड येथील रिक्त पोलीस पाटील पद भरा!

पोलीस विभाग संबंधित हे पद असून, गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस पाटील यांच्यावर असते. या शिवाय शालेय विद्यार्थ्यांना कागदपत्रे काढण्यासाठी तसेच ग्रामस्थांना विविध कामांसाठी पोलीस पाटील यांच्या दाखल्याची आवश्यकता भासते, परंतु विझोरा येथील हे पद चार वर्षांपासून रिक्तच आहे. आतापर्यंत प्रभार कातखेड येथील पोलीस पाटील यांच्याकडे होता. दरम्यान तेथील पदसुद्धा सेवानिवृत्त झाल्याने रिक्त झाले आहे. आता दोन्ही गावातील प्रभार गोरव्हा येथील पोलीस पाटील यांच्याकडे दिला आहे. ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध, अपंग यांना दाखल्यासाठी गोर व्हा येथे जाने शक्य नसून, नागरिकांना त्रास होत आहे. दोन्ही गावातील पोलीस पाटील पद प्रशासनाने तातडीने भरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Fill the vacant Police Patil post at Vizora, Katkhed!