विवाहितेच्या छळप्रकरणी पती, सासूविरुद्ध गुन्हा दाखल

By Admin | Updated: October 21, 2014 00:16 IST2014-10-21T00:16:28+5:302014-10-21T00:16:28+5:30

माहेरहून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याची विवाहितेची तक्रार.

Filed a complaint against husband and mother-in-law for harassing her | विवाहितेच्या छळप्रकरणी पती, सासूविरुद्ध गुन्हा दाखल

विवाहितेच्या छळप्रकरणी पती, सासूविरुद्ध गुन्हा दाखल

उरळ (अकोला) : माहेरहून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या विवाहितेच्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी सोमवारी पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला. गायगाव येथील जया राहुल वानखडे या २९ वर्षीय विवाहित महिलेने उरळ पोलिस ठाण्यात छळप्रकरणी तक्रार दिली. पती राहुल व सासू दुर्गा रघुनाथ वानखडे यांनी माहेरहून पैसे का आणत नाहीस, असे म्हणत १६ ऑक्टोबर रोजी जयाच्या हातावर व मनगटावर कैचीने मारून तिला जखमी केले तसेच शारीरिक व मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. उरळ पोलिसांनी राहुल व दुर्गा वानखडे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४९८ (अ) , ३२४, ५0४,५0६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार पी. के. काटकर यांच्या मार्गदर्शनात जमादार डांगे, संजय तायडे, संजय वानखडे हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Filed a complaint against husband and mother-in-law for harassing her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.