विद्यापीठातील कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:18 IST2021-02-05T06:18:03+5:302021-02-05T06:18:03+5:30
देशात कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमूळे राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची २०१९-२० ...

विद्यापीठातील कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
देशात कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमूळे राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील किंवा त्यापूर्वीची शैक्षणिक संस्थांना शिष्यवृत्तीची देय रक्कम शासनाकडून मिळाली नाही या सबबीखाली विद्यार्थ्य्यांचे प्रवेश रद्द करण्यात येऊ नये, असे निर्देश असतानाही हजाराे विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने परीक्षेपासून वंचित ठेवले. त्यामुळे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया प्रमुख तथा अकोला जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष भूषण गायकवाड यांनी राज्याच्या राज्यपालांकडे केली आहे
. सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्तीचा पर्याय स्वीकारून अनुसूचित जाती प्रवर्गातील हजारो विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला असताना. तसेच शिष्यवृत्तीचे Online अर्ज सुद्धा सादर केलेले असतांना व शिष्यवृत्ती अर्जाच्या त्रुटींची पूर्तता करण्याकरिता महाडीबीटीने २३ सप्टेंबरपर्यंत वेबसाईटच्या तारखा वाढवल्या असताना याबाबत विद्यापीठाने केंद्रांना व विद्यार्थ्यांना सूचना न दिल्याने काही विद्यार्थी सदर त्रुटींची पूर्तता करू शकले नाहीत. त्यामुळे २४८४ विद्यार्थ्यांपैकी बी.ए. भाग १ व भाग २ तसेच इतर हजारो विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने परीक्षेपासून वंचित ठेवले. असा आराेप भूषण गायकवाड यांनी केला आहे