अहिल्यादेवींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या अभिनेत्यावर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:20 IST2021-04-28T04:20:36+5:302021-04-28T04:20:36+5:30
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व जाती-धर्मांसाठी कार्य केले. आहे. त्यांनी देशभरात अनेक धर्मशाळा बांधल्या. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. ...

अहिल्यादेवींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या अभिनेत्यावर गुन्हा दाखल करा
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व जाती-धर्मांसाठी कार्य केले. आहे. त्यांनी देशभरात अनेक धर्मशाळा बांधल्या. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. संपूर्ण देशात जनतेच्या कल्याणासाठी अनेक लोकोपयोगी कार्य केले. त्यामुळे त्यांचा दर्जा हा लोकमातेचा आहे. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अभिनेता अतुल परचुरे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने सकल धनगर समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे अतुल परचुरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी सकल धनगर समाजाचे नेते प्रा. एल. डी. सरोदे, विनायक काळदाते, सदाशिव वाघ, देवेंद्र थोटे, संगीता पाटील, शारदा ढोमणे, प्रमिला नवलकार, ज्ञानेश्वर ढेपले, संगीता पुंडे, प्रकाश खाडे, मनोज करणकार, सचिन बचे, राजेश दिवनाले, किशोर वाघ, अभि नवलकर, सुधाकर ओहळ आदींनी केली आहे.