दोन गटात हाणामारी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:20 IST2021-09-27T04:20:26+5:302021-09-27T04:20:26+5:30

खेट्री: पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथे किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना दि. २४ सप्टेंबर ...

Fighting in two groups; Filed charges against five people | दोन गटात हाणामारी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दोन गटात हाणामारी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

खेट्री: पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथे किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना दि. २४ सप्टेंबर रोजी घडली आहे. या हाणामारीत दोन्ही गटातील दोन जण जखमी झाले आहे. याप्रकरणी दोन्ही गटाच्या परस्पर तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी पाच आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पिंपळखुटा येथे सांडपाण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही गटांनी थेट चान्नी पोलीस स्टेशन गाठले. याप्रकरणी एका गटाच्या गोपाल राखोंडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी स्वाती वाहोकार, पार्वताबाई वाहोकार, तसेच दुसऱ्या गटातील स्वाती वाहोकार, यांच्या फिर्यादीवरून आरोपी उज्ज्वला राखोंडे, गोपाल राखोंडे, महादेव राखोंडे असे दोन्ही गटाच्या परस्पर फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी पाच आरोपी विरुद्ध वेगवेगळ्या दिवशी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश महाजन, विलास नाफडे, सुधाकर करवते, करीत आहे.

Web Title: Fighting in two groups; Filed charges against five people