दोन गटांत हाणामारी; आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:13 IST2021-06-27T04:13:56+5:302021-06-27T04:13:56+5:30

खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाणेअंतर्गत शिरपूर येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २५ ...

Fighting in two groups; Charges filed against eight persons | दोन गटांत हाणामारी; आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल

दोन गटांत हाणामारी; आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल

खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाणेअंतर्गत शिरपूर येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २५ जून) घडली आहे. या हाणामारीमध्ये दोन्ही गटांतील आठजण जखमी झाले आहे.

रस्त्यावरून दोन्ही गटांत गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता; परंतु शुक्रवारी (दि. २५) वाद उफाळून आला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणी दोन्ही गटांच्या सदस्यांनी पोलिसांत धाव घेतली. अमान खा बाबर खा यांच्या फिर्यादीवरून आरोपी रिजवान खान मुकद्दर खा, कामरान खा मुकद्दर खा, मरदान खा मुकद्दर खा, इम्रान खा मुकद्दर खा, तसेच दुसऱ्या गटातील रिजवान खा गुलशेर खा, यांच्या फिर्यादीवरून आरोपी आमान खा बाबर खा, लूकमान खा अमान खा, करीम खा अमान खा, मुजाहिद खा लुकमान खा, असे एकूण दोन्ही गटांतील आठ आरोपीविरुद्ध चान्नी पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास आदिनाथ गाठेकर करीत आहे.

Web Title: Fighting in two groups; Charges filed against eight persons