युवकावर फायटरने हल्ला
By Admin | Updated: February 13, 2016 02:27 IST2016-02-13T02:27:07+5:302016-02-13T02:27:07+5:30
फायटरने हल्ला करणा-याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

युवकावर फायटरने हल्ला
अकोला: उमरी येथील रहिवासी युवकावर फायटरने हल्ला करणार्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. उमरी येथील रहिवासी गणेश भातुलकर याच्यावर उमेश सावरकर नामक युवकाने फायटरने हल्ला केला. यामध्ये गणेश जखमी झाला असून, त्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सावरकरविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.